27 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
नाशिकमधील चांदवड येथे शुक्रवारी झालेली गारपीट.
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरू आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आजदेखील पावसाला पोषक हवामान असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांत गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यातील वादळी पावसाचा इशारा दर्शवणारा नकाशा. (स्त्रोत- पुणे, हवामान विभाग)
वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा ( ऑरेंज अलर्ट)
- मराठवाडा – हिंगोली, नांदेड, लातूर
वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
- कोकण – पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
- मध्य महाराष्ट्र – नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर.
- मराठवाडा – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव
- विदर्भ – बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
अवकाळीचा जोर कमी होणार
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव व मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार गारपीट, अवकाळी पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात तर वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. आज वादळी पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. परंतू, राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राजस्थान, गुजरातवरील चक्राकार वाऱ्यांमुळे गारपीट
बांगलादेशात ताशी ४० किमी वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यामुळे बंगालच्या उपसागरावरून महाराष्ट्राकडे बाष्पयुक्त वारे ढकलले जात आहेत. दुसरीकडे राजस्थान व गुजरातच्या कच्छ भागावरही चक्रकार वारे वाहत आहेत. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून समुद्रावरील बाष्पयुक्त वारे महाराष्ट्रावर स्थिरावल्याने महाराष्ट्रात गारपीट होत असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
हवामान विभागाने जारी केलेले छायाचित्र. यात तेलंगणा, विदर्भ आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर ढग जमलेले दिसत आहेत.
संबंधित वृत्त
अवकाळी पावसाचा कहर सुरूच:उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान; परभणीत वीज कोसळून 4 जण ठार
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव व मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात शुक्रवारीही गारपीट, अवकाळी पावसाचा कहर सुरूच होता. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. परभणी जिल्ह्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यूू झाला. यात एका 15 वर्षीय मुलाचा समावेश आहे. वाचा सविस्तर