गांधीगिरी: समस्याग्रस्त नागरिकांचा नाशिकराेडला ठिय्या ; जेलरोडच्या नागरिकांचा आक्राेश मार्चा


नाशिकरोड3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

नाशिकरोड आणि जेलरोड परिसरातील साईनाथनगरमधील भूमिगत गटारी, रस्ता, पथदीप, जलवाहनिी, घंटागाडी, अस्वच्छता अशा समस्यांनी त्रस्त झालेल्या नागरिकांनी महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शिवसेनेच्या नेत्यांसह साईनाथनगरमधील नागरिकांनी विभागीय कार्यालयाच्या पायऱ्यांवर बसून ठिय्या आंदोलन करत विभागीय अधिकारी सुनील आव्हाड यांना निवेदन दिले.

Advertisement

गांधीजींची प्रतिमा देत गांधीगिरी : आंदाेलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना महात्मा गांधी यांची प्रतिमा भेट देऊन गांधीगिरी केली. आतातरी अधिकाऱ्यांना जाग येईल आणि समस्या सुटतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच यावेळी शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

साईनाथनगर, कॅनॉलरोड पूर्व, जेलरोड येथील रहिवाशांनी जेलरोड, बिटको चौक, मुक्तिधाम, महात्मा गांधीरोडवरून विभागीय कार्यालयावर माेर्चा काढला. आंदाेलनकर्त्यांच्या परिसरात भूमिगत गटारी, रस्ता, पथदीप, जलवाहनिी, घंटागाडी, अस्वच्छता या समस्या आहेत. आॅनलाइन तक्रारीच्या माध्यमातून लेखी, तोंडी, फोनद्वारे वारंवार तक्रार करूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहेत. जोपर्यंत कामास सुरुवात होत नाही, तोपर्यंत विविध आंदोलने सुरू राहतील. १ डिसंेबरपासून आमरण उपोषण करू असा इशारा यावेळी दिला. विभागीय अधिकारी सुनील आव्हाड यांनी १५ दिवसांत शक्य होईल, त्या कामांना सुरुवात हाेईल, असे आश्वासन दिले.यावेळी शिवसेना उपनेते बबन घोलप, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, रोहित गाडे, सूूर्यकांत लवटे, योगेश गाडेकर, अॅड. सुनील बाेराडे, राहुल ताजनपुरे, नितीन चिडे, राजेंद्र ताजणे, कुमार गायकवाड, योगेश देशमुख, विक्रम थोरात, कुमार पगारे, सागर भोजने, सागर निकाळजे, दिगंबर डबे, शिवा ताकाटे आदी उपस्थित होते.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement