गर्दीत मास्क घाला: ‘एच 3 एन 2’ रुग्णांत वातावरणातील बदलामुळेच वाढ; शहरात आतापर्यंत 26 रुग्ण


छत्रपती संभाजीनगर2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्याभरापासून शहरात ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण आढळत होते. आता सर्वत्र एन्फ्लुएन्झाचा संसर्ग वाढत असून कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाेन मुलांना एच ३ एन २ ची बाधा झाल्याचे समाेर आले आहे. जेरियाट्रिक विभागात ६५ वर्षांची महिला पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या तीन दिवसांत २६ रुग्ण पॉझिटिव्ह आढले आहेत.

Advertisement

या आजारावरील उपचारासाठी घाटीत चाळीस बेडचा वाॅर्ड तयार केला आहे. कोरोनाचा अनुभव असल्याने घाटी प्रशासन सज्ज आहे. सर्दी, खोकला, ताप आल्यास लगेच उपचार घ्यावेत, गर्दीत मास्क वापरावा, असा सल्ला घाटीचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांनी दिला आहे. सर्दी, ताप, खोकल्याने अवघे शहर बेजार झाले आहे. त्यामुळे सर्वच दवाखान्यात गर्दी वाढली आहे. आता एच ३ एन २ चे रुग्ण वाढत आहेत. कॅन्सर हॉस्पिटलमधील आठ आणि अकरा वर्षांची दोन मुले पॉझिटिव्ह आढळली.

मास्क वापरा : वातावरण खराब झालेले आहे. त्यामुळे मास्क वापरावा. व्याधी असलेल्या लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. लक्षणे आढळली तर लगेच डॉक्टरांना दाखवा, आजार अंगावर काढू नका. – डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, मेडिसिन विभागप्रमुख

Advertisement

अशी घ्या काळजी { अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ म्हणाल्या, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, रक्तदाब-मधुमेहाचा आजार आहे असे रुग्ण तसेच लहान मुले व वृद्धांनी काळजी घ्यावी. { हे विषाणू हवेमार्फत पसरणारे असल्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. चांगला आहार घ्या. विशेषत: गरम जेवण करा. मास्क, रुमाल वापरावा. { कोरोनाचा अनुभव आल्यामुळे स्वत:ची काळजी घ्या. सर्दी, खोकला, ताप आल्यास लगेच उपचार घ्या.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…



Source link

Advertisement