गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 2 हजार 717 गुंडांची तपासणी: पुणे पोलिसांची मध्यरात्री शहरात झाडाझडती

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात 2 हजार 717 गुंडांची तपासणी: पुणे पोलिसांची मध्यरात्री शहरात झाडाझडती


  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Investigation Of 2 Thousand 717 Hooligans In Pune In The Background Of Ganeshotsav; Pune Police Raided Trees In The City At Midnight

पुणे9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव, तसेच ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मध्यरात्री शहरातील गुंडाची झाडाझडती घेतली. पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात कारवाई करुन गुंडांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सणांच्या पार्श्वभूमीवर शहरात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Advertisement

उत्सवाच्या कालावधीत कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या सराईतांविरुद्ध कारवाई करण्यासाठी रविवारी मध्यरात्री विशेष मोहिम (कोम्बिंग ऑपरेशन)राबवून गुंडांची तपासणी करण्यात आली. गुन्हे शाखा, तसेच विविध पोलिस ठाण्यातील पथके या मोहिमेत सहभागी झाले होते. गुन्हेगार राहत असलेल्या भागाची पाहणी करण्यात आली. दोन हजार 544 गुंडांपैकी 717 गुंड मूळ पत्त्यावर राहत असल्याचे आढळून आले.

परिमंडळ एकच्या हद्दीत पोलिसांनी कोयता बाळगणाऱ्या गुंडाला अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. गावठी दारुची बेकायदा विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करुन एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिमंडळ दोनच्या हद्दीत गंभीर गु्न्ह्यात फरारी असलेल्या दोन जणांना अटक करण्यात आली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले.

Advertisement

बेकायदा गावठी दारु विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली. परिमंडळ तीन, परिमंडळ चार, परिमंडळ पाचमधील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी कारवाई केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने गांजा विक्री प्रकरणी पोलिसांनी अक्षय सुरेश शिंदे (वय 22, रा. मयूरी काॅलनी, हांडेवाडी रस्ता) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक किलो गांजा, मोबाइल , दुचाकी जप्त करण्यात आली.

गुन्हे शाखेच्या युनिट तीनने पर्वती भागात गंभीर गुन्ह्यातील आरोपी आदित्य युवराज भालेराव (वय 19), ऋतिक दिलीप कांबळे (वय २३), गौरव वामन चव्हाण (वय 23), अजय राजू दास (वय 19, रा. महात्मा फुले वसाहत, सिंहगड रस्ता) यांना अटक केली. पोलिसांनी रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसर, तसेच शहरातील लाॅज, हाॅटेलची तपासणी केली. तडीपार केल्यानंतर आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली. वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करुन 257 वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली.

Advertisement

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, रंजनकुमार शर्मा, प्रवीणकुमार पाटील, उपायुक्त अमोल झेंडे, संदीपसिंग गिल, स्मार्तना पाटील, सुहेल शर्मा, शशिकांत बोराटे, विक्रांत देशमुख, विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.Source link

Advertisement