पुणे5 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
एका पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षकाकरिता जागा मिळवून देण्यासाठी सुमारे तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. पोलिस निरीक्षक पदासाठी इतक्या मोठ्या प्रमाणत लाचेची मागणी झाल्याने मोठी खळबळ निर्माण झाली आहे.
याप्रकरणी खाजगी इसम अक्षय सुभाष मारणे आणि गणेश बबनराव जगताप (रा .सासवड , जि. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याबाबत एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांनी सासवड पोलिस स्टेशन येथे तक्रारी अर्ज केला होता. त्यावरून गुन्हा दाखल करण्याकरीता सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक घोलप यांचेकरीता अक्षय मारणे याने तीन लाख रूपये लाचेची मागणी केली होती.
सदर लाचेच्या मागणीस गणेश जगताप (रा.सासवड,पुणे) याने सहाय्य केले. म्हणुन संबंधित दोन आरोपीवर लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना एसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, आरोपी गणेश जगताप हा पुणे जिल्ह्यातील सासवड येथील एका मोठ्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मारणे आणि जगताप हे दोघे राजकीय नेत्याचे कामे करतात असे देखील सांगितले जात आहे. सदरची कारवाई पुणे विभाग पोलिस अधीक्षक अमोल तांबे , अप्पर अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक क्रांती पवार,पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे, सहा पोलिस उप निरिक्षक मुकुंद आयाचीत ,पोलीस हवालदार एस तावरे,चालक पो कॉ पांडुंरग माळी यांनी केली आहे.