गंडा: हाॅटेल रेटिंगचे ऑनलाइन काम देण्याची थाप, वेबसाईटद्वारे कमीशनच्या आमिषातून 11 लाखांची फसवणूक


पुणे10 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

​​​​​​​चिंचवड मधील केशवनगर येथे राहणाऱ्या गणेश मुकुंद अमृतकर (वय-२८) या तरुणास पायल नावाचे एका अज्ञात तरुणीने व इतर दाेन अनाेळखी माेबाईल धारकांनी संर्पक करुन ऑनलाइन काम मिळवून देताे असे सांगितले. त्यानुसार हाॅटेलला रेटिंग टास्क देण्याचे बहाण्याने एकूण ११ लाख रुपये ऑनलाइन गुंतवणुकीस घेऊन फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

याप्रकरणी चिंचवड पाेलीस ठाण्यात पायल (पूर्ण नाव नाही), सीएस चॅनल ११३ ,ट्रव्हल का टाॅप वेबसाईट धारक व एक अज्ञात माेबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १० ते २५ मे दरम्यान घडला आहे. तक्रारदार गणेश अमृतकर यांना पायल नावाचे तरुणीने संर्पक करुन सीएस चॅनल ११३ या टेलिग्राम चॅनलद्वारे तसेच ट्रॅव्हलका टाॅप या वेबसाईटद्वारे कमिशन देण्याचे बहाण्याने हाॅटेलला रेटिंग देण्याचा टास्क दिला. त्यावर अधिक परतावा देवून तक्रारदाराचा विश्वास संपादन करुन त्याद्वारे तक्रारदार यांना पैसे भरण्यास भाग पाडून त्यांची एकूण ११ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे.

तरुणास साडेसात लाखांचा गंडा

Advertisement

​​​​​​​मुळचा साेलापूर जिल्हयातील माढा येथे राहणारा व कामाच्या निमित्ताने पुण्यातील कर्वेनगर भागात राहणाऱ्या अनिकेत सुखदेव कदम या २३ वर्षीय तरुणाशी ऑनलाइन अज्ञात व्यक्तीने संर्पक साधला. त्यास पार्टटाईम नाेकरी देण्याचा बहाण्याने इंस्टाग्राम खाते फाॅलाे करण्यास सांगून त्यावरील व्हिडिओ लाईक केल्यास कंपनीकडून त्याबदल्यात पैसे मिळणार असे सांगितले. त्याप्रमाणे टेलिग्राम लिंक जाॅईन करण्यास सांगून वेगवेगळे टास्क देऊन त्याबदल्यात तक्रारदार यांचा फायदा हाेत असल्याचे भासवून त्यास प्रिपेड टास्कमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे भरण्यास भाग पाडून सात लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.



Source link

Advertisement