गंडा: गरीब मुलांना कपडे घेऊन द्या असा बहाणा करुन एटीएम कार्ड चोरले, एकाची दीड लाखांची फसवणूक


पुणे41 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

आम्ही खुप गरीब आहेत, आमच्या लहान मुलीला कपडे घेऊन द्या असे म्हणत दोन अनोळखी महिलांनी एका व्यक्तीला दुकानात नेऊन मुलांसाठी कपडे घेतले. याचवेळी हात चलाखी करून चोरलेले एटीएम कार्ड सराफी दुकानात जाऊन महिलांनी स्वाईप करत 50 हजार रूपयांचे सोने खरेदी केले. तसेच ठिकठिकाणच्या एटीएममधून 96 हजार असा तब्बल 1 लाख 46 हजारांची फसवणूक केल्या प्रकरणी दोन अनोळखी महिलांविरोधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत अजिंक्य महादेव डोळस (31, रा. तेज सोसायटी, कामधेनु इस्टेट, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पाच मे रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार अजिंक्य यांचे वडील महादेव डोळस यांना दोन अनोळखी महिला भेटल्या. त्या महिलांनी डोळस यांना आम्ही खुप गरीब आहोत, आमच्या लहान मुलीला कपडे घेवुन द्या असे म्हणुन हडपसर येथील सोनपरी ड्रेसेस या दुकानात घेऊन गेल्या.

तेथे कपडे खरेदी केले. तसेच कपडे खरेदी करताना हात चलाखी करून डोळस यांच्या बँकेचे एटीएम घेवुन कामधेनु इस्टेट येथील दुकानातून 50 हजारांचे सोने महिलांनी खरेदी केले. त्यासाठी चोरलेले कार्ड स्वाईप केले. नंतर त्यांनी ठिक ठिकाणावरील एटीएम मधुन 96 हजार रूपये काढून तब्बल 1 लाख 46 हजारांची फसवणूक केली आहे.

Advertisement

ऑनलाईन दंडानंतर बनावट नंबर प्लेट वापरून रिक्षा चालवणाऱ्याचे कारनामे उघड

विना लायसन्स व विना गणवेश रिक्षा चालवत असल्याबाबत दंड पडल्याचा मॅसेज आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीकांत मोहन वेळेकर (36, रा. महात्मा गांधी वसाहत, शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत राजेंद्र चंद्रकांत बोराटे (50, रा. पिंपरे खुर्द, निरा) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Advertisement

दि. 21 मे रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र बोराटे यांना त्यांच्या मोबाईल गाडीचा हजार रूपये दंड पडल्याचा मॅसेज आला. या मॅसेजमध्ये खडकी येथे विना लायसन्स व विना गणवेश रिक्षा चालवत असल्याचा तो दंड होता. परंतु, आपण आपली गाडी या ठिकाणी घेऊनच गेलो नसताना दंड कसा काय पडला ? याची माहिती घेतली असता बोराटे यांना कोणीतरी आपल्या गाडीची बनावट नंबर प्लेट वापरून रिक्षा चालवत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुगदुम करत आहेत.Source link

Advertisement