खोचक टोला: अपात्रतेबाबत सर्व बाबी शिंदे गटाविरोधात; मात्र, हे तपासायला राहुल नार्वेकर, ही एकच बाजू सोयीची- नरहरी झिरवळ


मुंबई15 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अपात्रतेबाबत सर्वोच्च्या न्यायालयाने नोंदवलेली सर्व निरीक्षणे हे शिंदे गटाच्या आमदारांच्या विरोधात आहे. केवळ एकच बाब त्यांच्या बाजुची आहे. ती म्हणजे हे तपासायला विधानसभा राहुल नार्वेकरांकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे, असा टोला विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी नार्वेकरांना लगावला आहे.

Advertisement

तसेच, राहुल नार्वेकर यांनी कितीही तपास केला तरी तपास म्हणजेच अपात्रतेचा निर्णय ठरलेला आहे, असे सूचक वक्तव्यही नरहरी झिरवळ यांनी केले.

राहुल नार्वेकरांनी शिवसेनेची घटना मागवली

Advertisement

शिवसेना मूळ पक्ष कोणाचा आणि शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. लवकरात लवकर या प्रकरणी निर्णय घ्यावा, असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राहुल नार्वेकर यांनी या निर्णयाबाबत पावले उचलायला सुरुवात केली आहे. नार्वेकरांनी शिवसेना पक्षाची घटना ही विधिमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याची माहिती समोर आली आहे.

कितीही तपास केला तरी…

Advertisement

यावर भाष्य करताना नरहरी झिरवळ म्हणाले, राहुल नार्वेकर यांच्याकडे तपासण्यापलीकडे मार्ग राहीलेला नाही. पण, राहुल नार्वेकर कितीही दिवस तपासत राहिले, तरी तपास शेवटी ठरलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 10 ते 12 त्रुटी सांगितल्या आहेत. त्या सगळ्याच 16 आमदारांच्या विरोधात आहेत. फक्त एकच बाब आहे की ती तपासायला राहुल नार्वेकरांकडे दिली आहे. तपास हा तपासच असतो. तो कधीपर्यंत चालेल याची खात्री नाही.

लवकरात लवकर म्हणजे कधी?

Advertisement

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना योग्य वेळेत किंवा लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे निर्देश दिले आहे. मात्र, लवकरात लवकर म्हणजे किती कालावधी हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले नाही. त्यासंदर्भात बोलताना नरहरी झिरवळ यांनी खोचक प्रतिक्रिया दिली. झिरवळ म्हणाले, ‘लवकरात लवकर’ ही एक राजकीय व्यासपीठावरची किंवा सभागृहातील भाषा आहे. लवकरात लवकर याला कधीही लवकर म्हणता येते. परवाही लवकर आणि सहा महिन्यांनीही लवकरच असते.

वेळेत निर्णय घेणार- नार्वेकर

Advertisement

दरम्यान, आमदारांच्या अपात्रतेबाबत केव्हा निर्णय देणार, याबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. राहुल नार्वेकर म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणेच मी वेळेत निर्णय घेणार आहे. मात्र, तो कालावधी किती दिवसांचा असेल हे मी तुम्हाला आता सांगू शकत नाही. ही प्रक्रिया पूर्ण व्हायला जेवढा वेळ लागेल तो लागणारच आहे. मात्र, निर्णय जाहीर करण्यात उशीर केला जाणार नाही.

हेही, वाचा

Advertisement

पुणे लोकसभा पोटनिवडणूक लवकरच:विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली शक्यता; म्हणाले, ‘आतल्या गोटातून मिळाली माहिती’

युतीत बिघाडी:लोकसभेच्या 22 जागांवर दाव्यानंतर शिवसेना-भाजपमध्ये 36 चा आकडा; मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याची खदखद

Advertisement

युतीत सर्व आलबेल:खासदार गजानन कीर्तिकर यांचे गैरसमज दूर करू, भाजप व शिवसेनेची युती घट्ट- मंत्री दीपक केसरकर



Source link

Advertisement