खेळाच्या मैदानातून मनोरंजन क्षेत्रात… सानिया आणि शोएबची नवी ‘पार्टनरशीप’; टीझर शेअर करत म्हणाले…


सानिया आणि शोएब दोघांनाही हा व्हिडीओ शेअर करताना जवळजवळ सारखीच कॅप्शन दिल्याने चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

Advertisement

भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिचा नवरा म्हणजेच पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक नेहमीच वेगवगेळ्या कारणांसाठी चर्चेत असतात. मात्र आता ते चर्चेत आहे त्यांनी आपआपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे. दोघांनीही आपल्या चाहत्यांसाठी एक सारखाचा व्हिडीओ आपआपल्या अकाऊंटवरुन शेअर केलाय. हा व्हिडीओ एखाद्या मालिकेचा किंवा चित्रपटाच्या टीझरची झलक दाखवणारा आहे.

सानिया आणि शोएब दोघांनाही हा व्हिडीओ शेअर करताना जवळजवळ सारखीच कॅप्शन दिलीय आणि हा आपला संयुक्त प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं आहे. या दोघांच्या कॅप्शनमध्ये लव इज इन दी एअर असा कॉमन हॅशटॅग दोघांनी वापरल्याने या मालिकेचं किंवा चित्रपटाचं हेच नाव असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Advertisement

या टीझरमध्ये सानिया मिर्झाचा चेहरा दिसत नाहीय मात्र शोएब मलिक दोन सीनमध्ये दिसतोय. एका ठिकाणी तो धावाताना दिसत आहे तर एका सीनमध्ये तो कारमधून बाहेर येताना दिसतोय. सानियाचा चेहरा दिसत नसला तरी एक महिला पांढऱ्या कपड्यांमध्ये टेनिस कोर्टवर दिसत आहे. ही महिला म्हणजे सानिया असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.

“ज्या प्रोजेक्टवर मी काम करत आहे त्याचा टीझर शेअर करताना फार आनंद वाटतोय. याचं संपूर्ण व्हर्जन लवकरच येत आहे,” असं सानियाने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

Advertisement

तर शोएब मलिकने, “मला माझ्या या प्रजोक्टचा टीझर शेअर करताना फार अभिमान वाटतोय. लवकरच तुम्हाला पूर्ण व्हर्जन पहायला मिळेल,” असं म्हटलंय.

मात्र हे दोघे ज्याला प्रोजेक्ट म्हणत आहेत ती मालिका आहे की चित्रपट हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र कमेंटमध्ये अनेकांनी वेगवेगळे तर्क लावले आहेत. काहींनी ही मालिका असल्याचं म्हटलंय तर काहींनी या दोघांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट असल्याचा अंदाज व्यक्त केलाय.

Advertisement

२०१० मध्ये शोएब आणि सानियाच्या प्रेमासंदर्भात चर्चा रंगू लागल्या. त्यानंतर त्यांनी १२ एप्रिल २०१० रोजी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न केलं. आज या दोघांना तीन वर्षांचा एक मुलगा असून त्याचं नाव इजहान मिर्झा मलिक असं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

AdvertisementSource link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here