मुंबईएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांसाठी ‘सुवर्ण’संधी आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ५५ हजार ८०० रुपये झाला असून कालच्या दराच्या तुलनेत ३०० रुपयांनी सोन्याचा भाव गडगडला आहे.
गुरुवारी प्रति १० ग्रॅमसाठी ५६ हजार १०० रुपये मोजावे लागत होते. तर २४ कॅरेट सोन्यासाठी ६१ हजार २०० रुपये मोजावे लागत होते. आज २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅम ६० हजार ८७० रुपये मोजावे लागत आहेत.
चांदीच्या दरात वाढ
चांदीचे दर काल 72 हजार 370 रुपये किलो होते. आज दर 72 हजार 470 रुपये प्रति किलो वर आले आहेत. म्हणजे साधारण किलो मागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे.
चांदीचे आजचे दर
72 हजार 470 रुपये किलो
प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर
शहर | २२ कॅरेट (रु) | कालचा दर (रु) |
मुंबई | 55,800 | 56,100 |
पुणे | 55,800 | 56,100 |
नाशिक | 55,800 | 56,100 |
नागपूर | 55,800 | 56,100 |
औरंगाबाद | 55,800 | 56,100 |
24, 22, 21, 18 आणि 14 कॅरेटमध्ये काय फरक?
24 कॅरेट सोन्याला शुद्ध सोने म्हणतात. त्यात इतर कोणत्याही प्रकारचा धातू मिसळलेला नसतो. याला 99.9 टक्के शुद्धतेचे सोने म्हणतात. तर 22 कॅरेट सोने 91.67 टक्के शुद्ध सोने आहे. इतर 8.33 टक्के मध्ये इतर धातू आहेत. तसेच 21 कॅरेट सोने 87.5 टक्के शुद्ध सोने आहे. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यामध्ये 58.5 टक्के शुद्ध सोने असते.
दर चढे राहण्याची शक्यता
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरता लक्षात घेता, पुढील काळात सोने-चांदीचे दर अजून वाढण्याची शक्यता आहे. कारण सोने चांदी मध्ये अनेक जण गुंतवणूक करत असतात. त्यामुळे येत्या काळात भाव चढेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे