खुलासा: जयंत पाटीलच काय, मी यापूर्वी छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीवरही भाष्य केले नव्हते- अजित पवार


15 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीने सोमवारी तब्बल 9 तास चौकशी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवारांसह अनेक ज्येष्ठ नेत्यांनी जयंत पाटील यांची फोनवरून विचारपूस केली होती. मात्र, आपल्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोन आला नाही, असा नाराजीचा सूरही जयंत पाटील यांनी व्यक्त केला होता. त्यावर आता अजित पवार यांनी स्वत:च खुलासा केला आहे.

Advertisement

तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार

आज पत्रकार परिषदेत यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले की, तपास यंत्रणांना चौकशीचा अधिकार आहे. त्यांनी चौकशीला बोलावल्यावर आमची भूमिका ही सहकार्याचीच असते. स्वत: जयंत पाटील यांनीदेखील हीच भूमिका मांडली आहे. तसेच, मी कोणत्याही नेत्याच्या चौकशीवर प्रतिक्रिया देत नाही. छगन भुजबळ आणि नवाब मलिक यांच्या प्रकरणावरही मी बोललो नव्हतो.

Advertisement

यापूर्वी तरी कुठे बोललो?

जयंत पाटील यांना ईडीने समन्स बजावताच ठाकरे गटासह, काँग्रेसनेही भाजपवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, सुप्रिया सुळे यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. मात्र, अजित पवारांनी यावर काहीच भूमिका मांडली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या मौनावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या होत्या. याबाबत पत्रकारांनी विचारताच अजित पवार म्हणाले, जेव्हापासून भाजप सत्तेवर आहे, तेव्हापासून मी कोणत्या नेत्याच्या ईडी चौकशीबद्दल बोललो आहे, हे दाखवून द्या. याआधी त्यांनी छगन भुजबळ यांना केंद्रीय तपास यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले होते. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर मला दाखवा. अनिल देशमुख यांना देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी मी काही वक्तव्य केले असेल तर दाखवा. प्रफुल्ल पटेल यांच्यावेळी मी काही बोललो असेल तर दाखवा. जयंत पाटील यांना एकट्यालाच ईडीने चौकशीसाठी बोलावलं नाही. माध्यमे जाणिवपुर्वक काही वेगळे अर्थ काढण्याचा प्रयत्न करता. हे चुकीचे आहे.

Advertisement

माझ्यावर आयकरच्या 22 धाडी

अजित पवार म्हणाले, मी कोणाच्याही चौकशी बाबतीत कोणतेही वक्तव्य करत नाही. माझ्याही बाबतीत आयकर विभागाने 22 ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यावेळीच मी जे बोलायच ते बोललो. त्यानंतर पुन्हा मी माझ्या कामाला लागलो. मात्र, भाजपमध्ये गेल्यांची चौकशी होत नाही. सूडभावनेतून चौकशीला बोलवणे चुकीचे आहे, असे मतही अजित पवारांनी मांडले.

Advertisement

संबंधित वृत्त

IL&FS घोटाळा:राष्ट्रवादीच्या 11 व्या नेत्यामागे ईडापिडा; जयंत पाटील यांची 9.30 तास चौकशी, कार्यकर्त्यांकडून भाजपावर आरोप

Advertisement

‘IL & FS’ प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी अधिकाऱ्यांनी सोमवारी तब्बल साडेनऊ तास चौकशी केली. दुपारी १२ वाजता ईडी कार्यालयात गेलेले पाटील रात्री ९.३० वाजता बाहेर आले. ‘विरोधी पक्षात असल्याची किंमत मला चुकवावी लागत अाहे,’ असे त्यांनी सकाळी सांगितले होते. तर चाैकशी पूर्ण झाल्यानंतर ‘त्यांच्या सर्व प्रश्नांची मी समाधानकारक उत्तरे दिली आहेत, आता काही प्रश्न शिल्लक नसतील,’ अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. वाचा सविस्तरSource link

Advertisement