‘खुपते तिथे गुप्ते’चा प्रोमो प्रदर्शित: अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत – मुलाखतीत राज ठाकरेंचा जोरदार टोला


मुंबईएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

‘खुपते तिथे गुप्ते’ या बहुचर्चित शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साहाजिकच अवधूत गुप्ते या शोचे सूत्रसंचालन करणार असून शोमध्ये कलाकारांसह राजकीय नेतेही हजेरी लावणार आहेत. राज ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित झाला असून त्यात राज ठाकरे जोरदार टोलेबाजी करताना दिसले. अजित पवार स्वःतच्या मुलाला निवडून आणू शकले नसल्याचा टोला राज यांनी त्यांच्या खास शैलीत अवधूत गुप्तेंच्याएका प्रश्नावर लगावला. या शोचे काही प्रोमो व्हिडीओही प्रदर्शित करण्यात आले आहेत.

Advertisement

‘खुपते तिथे गुप्ते’चा हा नवा प्रोमो व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राज ठाकरेंनंतर या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत.

राज ठाकरे लावणार हजेरी

Advertisement

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘खुपते तिथे गुप्ते’ शोमध्ये हजेरी लावणार आहेत. या शोच्या दुसऱ्या सीझनमधील एक नवा प्रोमो व्हिडीओ नुकताच प्रदर्शित करण्यात आला. झी मराठीच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांना टोला लगावताचा व्हिडिओ कट प्रोमोमध्ये आहे.

राज ठाकरेंनी का लगावला टोला

Advertisement

‘खुपते तिथे गुप्ते’मध्ये राज ठाकरेंना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला होता. यामध्ये अजित पवारांचे भाष्यही होते की, ”निवडणुकीत एकवेळ १४ आमदार निवडून आणले. त्यानंतर सर्व लोक त्यांच्यापासून (राज ठाकरेंपासून) दूरावले.” यावर राज ठाकरेंनी अजित पवारांची मिमिक्री करत “ए गप रे…असे मी म्हणणार होतो,” असे प्रत्युत्तर दिले.

स्वतःच्या मुलाला निवडून आणू शकले नाही

Advertisement

राज ठाकरेंनी मुलाखतीत म्हटले की, ”अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचे तरी काय होईल” असं म्हणत राज ठाकरेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे.



Source link

Advertisement