खासदार हेमंत पाटील यांची माहिती: मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर हस्तक्षेप करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार

खासदार हेमंत पाटील यांची माहिती: मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर हस्तक्षेप करण्यासाठी पंतप्रधानांची भेट घेणार


हिंगोली16 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

राज्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर हस्तक्षेप करून समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून त्यासाठी राज्यातील सर्वच खासदारांना सोबत घेणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी बुधवारी ता. 6 हिंगोलीत पत्रकार परिषदेत दिली आहे.

Advertisement

हिंगोली येथील शासकिय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या भावना तिव्र आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलनाचा भडका उडाला असून अनेक ठिकाणी आंदोलने केले जात आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी ता. 18 सप्टेंबर ते ता. 22 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडणार आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी अधिवेशनात करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रश्‍नात हस्तक्षेप करण्याची मागणी करणार आहे.

Advertisement

त्यासाठी राज्यातील सर्वच खासदारांना सोबत घेणार असून या सर्वांंना सोबत घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्‍न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढे मांडणार असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या भेटीसाठी राज्यातील सर्वच खासदारांनी सोबत येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.Source link

Advertisement