- Marathi News
- Local
- Maharashtra
- Mumbai
- Khashaba Jadhavs Birthday Now Maharashtra State Sports Day’CM Eknath Shinde | Shiv Chhatrapati Award Cm Eknath Shinde Ajit Pawar Devendra Fadanvis
मुंबई18 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या दिग्गजांना आज राज्य सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गेल्या तीन वर्षांतील पुरस्काराचे आज वितरण करण्यात आले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
राज्यात क्रीडा संस्कृतिचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या या क्रीडा महर्षि, मार्गदर्शक, खेळाडू, यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्यात येतात. सन 2019-20, 2020-21 व 2021-22 या तीन वर्षाचे पुरस्कार शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 14 जुलै रोजी जाहीर करण्यात आले होते. आज त्याचे वितरण करण्यात आले.
2019-20,2020-21 व 2021-22 या वर्षातील शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ), साहसी पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे.
खाशाबा जाधवांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिन असेल : CM शिंदे
महाराष्ट्राचे ऑलिंपिक कास्यपदक विजेते मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणजेच 15 जानेवारी हा यापुढे राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
तसेच जीवनगौरव पुरस्कारासाठी 5 लाख रुपये तर अन्य पुरस्कारांसाठी 3 लाख रुपये देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, कै. खाशाबा जाधव हे सर्वांचे प्रेरणास्थान आहे. त्यांच्या कार्यापासून प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिन दरवर्षी राज्याचा क्रीडा दिन म्हणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. क्रीडा पुरस्काराच्या रकमांमध्ये वाढ करावी ही गेली काही वर्षे मागणी होती.
त्यानुसार आम्ही जीवनगौरव पुरस्कारासाठी तीन लाख रुपये ऐवजी पाच लाख रुपये तर अन्य क्रीडा पुरस्कारांसाठी एक लाख रुपयाला आयोजित तीन लाख रुपये देण्याचे जाहीर करीत आहोत”. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवावा या दृष्टीने महाराष्ट्राच्या खेळाडूंना आम्ही काही कमी पडून देणार नाही आमचे शासन सदैव त्यांच्या पाठीशी असणार आहे.
कोणते आणि किती ़पुरस्कार दिले गेले..
पुरस्काराचे नाव | पुरस्कार संख्या Advertisement
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार | 2 Advertisement
|
उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मार्गदर्शक | 13 Advertisement
|
जिजामाता पुरस्कार ( क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार ) | 1 Advertisement
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू ) | 81 Advertisement
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार | 5 Advertisement
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार ( दिव्यांग खेळाडू) | 14 Advertisement
|
एकूण | 116 Advertisement
|
शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी
अ.क्र. Advertisement
| वर्ष | नाव Advertisement
|
1 | सन 2019-20 Advertisement
| श्रीकांत शरदचंद्र वाड, ठाणे |
2 Advertisement
| सन २०२०-२१ | दिलीप बळवंत वेंगसरकर, मुंबई. Advertisement
|
3 | सन 2021-22 Advertisement
| आदिल जहांगिर सुमारीवाला, मुंबई |