खानमपूर वळणावर दुर्घटना: अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाचा मृत्यू, लग्न समारंभाहून घरी येताना घटना


अमरावती2 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

परतवाडा येथील विवाह समारंभ आटोपून दुचाकीने परतत असताना पांढरी खानमपुर येथील वळणावर झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवारी सायंकाळी घडली.

Advertisement

तालुक्यातील निमखेड बाजार येथील रहिवाशी विठल नागोराव भुसूम (वय २४) व अक्षय बंडू मस्के (वय १८) हे दोघे मित्र परतवाडा येथे एका विवाह समारंभासाठी गेले होते. लग्न आटोपून ते स्प्लेंडर दुचाकी (क्र.एम. एच. २७, सी. एस. ३३९१) या दुचाकीने परतत होते. दरम्यान सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांची दुचाकी पांढरी खानमपूर येथील वळणावर होती.

या दुचाकीला मोठा अपघात झाला आणि अपघातात मागे बसलेला अक्षय मस्के हा दुचाकीवरून पडला. त्याला गंभीर इजा झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही झाला. परिणामी त्याचा जागीच मृत्यू झाला. कुण्यातरी अज्ञात वाहनाने धडक दिली असल्याची चर्चा नागरिक करत होते. पुढील तपास ठाणेदार दीपक वानखडे यांच्या मार्गदर्शनात एपीआय अनंत हिवराळे करित आहेत.

Advertisement

शेतात शार्टसर्किट, लाखोंचे नुकसान

अमरावती येथील प्रगतशील शेतकरी गजानन बारबुद्धे यांच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. या आगाती तब्बल आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. शेतातून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीच्या तारा रात्री तुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे पुढे आले आहे. तारा तुटल्याने मोठा अग्नीलोळ निर्माण झाला. त्यात तब्बल आठ लाख रुपयांचे शेती साहित्य भस्मसात झाले.

Advertisement

शेताच्या मधोमध जात असलेली उच्च दाबाची विद्युत वाहिनी तुटल्याने आग लागून २५०० नग प्लास्टिक क्रेट, ८ ते १० ट्रॉली शेणखत, १००० बासे तसेच ३० एकराचा नायलॉन तार जळून खाक झाला. अकस्मात ओढवलेल्या या संकटामुळे सदर शेतकरी हवालदिल झाला असून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीद्वारे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.Source link

Advertisement