कोल्हापूर15 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विद्यमान अध्यक्ष विश्वास पाटील १७ मे रोजी राजीनामा देणार असून त्यानंतर आठ दिवसांनी डोंगळे यांची निवड होणार आहे. अध्यक्ष बदलण्यासाठी ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अरुण डोंगळे यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले. संचालकांनीही एकमताने डोंगळे यांच्या नावाला पसंती दिली.
गोकुळमध्ये खांदेपालट
गोकुळमध्ये खांदेपालट होत आहे. दरम्यान, चौकशीची टांगती तलावर आहे. ‘गोकुळ’ची चौकशी थांबवण्यासाठी सत्ताधारी गटाकडून दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
त्यामुळे सत्ताधारी गटाला धक्का बसला आहे. राज्य सरकारने दिलेल्या आदेशानंतर सुरु असलेले चाचणी लेखापरीक्षण थांबवावे, यासाठी गोकुळकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने एक महिन्यात लेखा परीक्षण पूर्ण करुन 8 जूनपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.