खळबळजनक: अमरावतीच्या चिचखेडा येथील नवदाम्पत्यांचे मृतदेह सापन धरणात आढळले; सामुहिक आत्महत्येचा संशय


अमरावती8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अचलपूर तालुक्यातील वझ्झर गावानजीक असणाऱ्या सापन धरणाच्या जलक्षेत्रात आज, गुरुवारी सकाळी ६.३० ते ७ च्या सुमारास महिला व पुरुषाचा मृतदेह तरंगतांना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. हे मृतदेह चिचखेडा येथील नवदाम्पत्याचे असल्‍याचे स्पष्ट झाले असून विक्की मंगलदास बारवे (२४) व तुलसी विक्की बारवे (२१) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे अकरा महिन्यांपूर्वीच विवाह बंधनात अडकले होते. त्यांनी प्रेमविवाह केल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

या घटनेची माहिती परतवाडा पोलिसांना कळताच ते तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सापन धरणातील जलपात्रात असणाऱ्या मृतदेहांना सुरमा भोपाळी यांच्या माध्यमातून बाहेर काढले. त्यानंतर दोन्ही मृतदेह अचलपुरच्या उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी अत्यंत बारकाईने परिसराची पाहणी केली असता त्या परिसरात एक दुचाकीसुद्धा (पल्सर) आढळून आली. ती दुचाकी विक्कीने त्याच्या नातेवाईकाकडून मंगळवारी दुपारी घेतल्याचे तपासाअंती उघड झाले आहे.

दरम्यान हे अनोळखी मृतदेह कुणाचे ?, या अनुषंगाने पोलिसांनी चौकशी सुरु केली असता ते चिखलदरा तालुक्यातील चिचखेडा येथील विक्की व तुलसी बारवे या पती-पत्नीचे असल्याचे स्पष्ट झाले.

Advertisement

पोलिस व गावकऱ्यांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार विक्की हा ट्रॅक्टरचालक आहे. तो ट्रॅक्टर चालविण्याशिवाय स्वत:ची शेतीही करायचा. विक्कीच्या वडीलांचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच निधन झाले. तत्पूर्वी त्यांना अर्धांगवायुचा धक्का बसला होता, अशी गावकऱ्यांची माहिती आहे. विक्कीच्या कुटुंबात दोन एकर शेती आहे. दोघेही भाऊ, आई आणि त्याची पत्नी हे गुण्या-गोविंदाने रहात होते. त्यांच्यात कुठलाही कौटुंबीक कलह नव्हता, अशीही गावकऱ्यांची माहिती आहे. त्यामुळे दोघांनीही जीव का दिला ? हा प्रश्नाची उकल करणे, पोलिसांसाठी आव्हानात्मक काम बनले आहे.

धरण ठरतेय सुसाईड पॉईंट

Advertisement

सापन धरण परिसरात दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी अनेक लोकं जातात. त्यात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश असतो. दरम्यान या धरणावर गुरुवारी पती-पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. यापूर्वीही कांडली व मुगलाईनिवासी दोन मुलींनी या धरणावर आत्महत्या केली आहे. त्यामुळे सिंचन विभागाने धरणाभोवती सुरक्षेच्या आवश्यक त्या उपाययोजना कराव्या, अशी मागणी पुढे आली आहे.

असा लागला छडा

Advertisement

दोघेही घरी न परतल्यामुळे आई आणि भावाने विक्कीच्या मोबाईलवर फोन केला.तो फोन एका महिलेजवळ होता. धरणाच्या कडेला एक बॅग सापडली. त्यात काही रक्कम, पॅन कार्ड व हा फोन होता, असे ती महिला म्हणाली. सोबतच ही सर्व सामग्री आम्ही आता पोलिसांच्या स्वाधीन करणार आहोत, हेही त्या महिलेने स्पष्ट केले.



Source link

Advertisement