खराब फॉर्मवर विराट कोहलीकडून एका वाक्यात टीकाकारांना उत्तर, म्हणाला..


Advertisement

Virat in IPL 2022 : अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) मागील काही काळापासून खराब फॉर्ममध्ये दिसत आहे. 70 शतकं लगावणाऱ्या विराटने 2019 नंतर एकही शतक लगावलेलं नाही. त्यात सध्या सुरु असलेल्या आयपीएल 2022 मध्येही विराट खास कामगिरी करत नाहीये. आतापर्यंत त्याने 12 सामन्यात 216 धावा करत केवळ एक अर्धशतक झळकावलं आहे. दरम्यान या त्याच्या खराब फॉर्मवर सर्व स्तरातून टीका होत असताना विराटने पहिल्यांदाच यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. विराटने सर्व टीकाकारांना एका वाक्यात उत्तर दिलं आहे. 

आरसीबी (RCB) संघाच्या एका सोशल मीडियावरील एका मनोरंजन व्हिडीओमध्ये विराटची मुलाखत घेण्यात आली. यावेळी विराटला खराब फॉर्मबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा विराट म्हणाला, ”मी अशावेळी टीव्हीचा आवाज बंद करतो, तसंच अशा लोकांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही.” विराटने अशाप्रकारे एका वाक्यात उत्तर देत सर्व टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. 

Advertisement

संपूर्ण मुलाखत पाहा –

Advertisement

IPL 2022 विराट कोहलीचे प्रदर्शन 

आयपीएलच्या 15 व्या हंगामात विराट कोहलीचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिलेय. विराट कोहली यंदा तीन वेळा शून्यावर बाद झालाय. तर एक वेळा 1 धाव काढून परतलाय. कोलकाताविरोधात 12, राजस्थानविरोधात 5, दिल्लीविरोधात 12, राजस्थानविरोधात 9 धावा काढून बाद झालाय. विराट कोहलीने 11 सामन्यात 21 च्या सरासरीने आणि 111 च्या स्ट्राईक रेटने 216 धावा चोपल्या आहेत.  

Advertisement

आयपीएलमध्ये विराट कोहली सहाव्यांदा शून्यावर बाद-

Advertisement

Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement


Advertisement

Advertisement
विरुद्ध संघगोलंदाजाचं नाववर्ष
मुंबई इंडियन्सआशीष नेहरा2008
पंजाब किंग्जसंदीप शर्मा2014
कोलकाता नाईट रायडर्सनाथन कुल्टर नाईल2017
लखनौ सुपर जायंट्सदुष्मंता चमीरा2022
सनरायजर्स हैदराबादमार्को जेनसन2022
सनरायजर्स हैदराबादजे सुचित2022

आयपीएल 2022 मधील विराट कोहलीचं प्रदर्शन-
1) 41*(29)
2) 12(7)
3) 5(6)
4) 48(36)
5) 1(3)
6) 12(14)
7) 0(1)
8) 0(1)
9) 9(10)
10) 58(53)
11) 30(33)
12) 0(1)

हे देखील वाचा-

AdvertisementSource link

Advertisement