मुंबई10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
अनिल देशमुख यांना 2 वर्षापूर्वी भाजपची ऑफर होती, असे ते म्हणताय तर ही गोष्ट ते आता सांगताय ते इतकी वर्षे कोमात होते का? संजय राऊत तर रोजचा भोंगा आहे. त्यांच्याविषयी बोलण्यास मलाही लाज वाटत आहे, असे म्हणत शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी राऊत-देशमुखांना खडे बोल सुनावले आहेत.
जयंत पाटील यांनी भाजपची गुलामगिरी नाकारली. त्यांनी भाजपमध्ये जाण्याचा प्रस्ताव नाकारला. त्यामुळेच त्यांना ईडीचे बोलावणे आल्याचा आरोप सामनातून करण्यात आला आहे. तसेच संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्यावर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
गुन्ह्यांना लपवण्याचा प्रकार
अनिल देशमुखांच्या आरोपांवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, असे आरोप करण्यात आता काय अर्थ आहे. ही गोष्ट तुम्ही तुमचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्षांना याबाबत काही सांगितले होते का. हा सायको प्रकार आहे. जेलमध्ये जाऊन आल्यानंतर स्वतः केलेल्या गुन्ह्यांना लपवण्याचा हा प्रकार आहे.
राऊत नालायक माणूस
संजय राऊत यांच्यावर आता काय बोलणार. रोजचा तो भोंगा आहे. त्यांच्याविषयी बोलताना मला लाज वाटत आहे. संजय राऊत नालायक माणूस आहे. भाजपला जर यांना जेलमध्ये टाकायचे असेल तर ते चुटकीसरशी टाकू शकतात. 2024 मध्ये आम्हाला उमेदवार मिळणार नाहीत. असेच ते उद्धव ठाकरेंच्या कानात बोलायचे. मात्र 40 आमदारांनी उठाव केला.
नेमके काय आहेत अनिल देशमुखांचे आरोप?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. मला भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच ऑफर मिळाली होती. त्यावेळी जर मी तडजोड केली असती तर महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असा आरोप देशमुखांनी केला आहे.
संबंधित वृत्त
चर्चा:भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच होती ऑफर, तडजोड केली असती, तर ‘मविआ’चे सरकार तेव्हाच पडले असते – अनिल देशमुख
मला भाजप प्रवेशाची 2 वर्षांपूर्वीच ऑफर मिळाली होती. त्यावेळी जर मी तडजोड केली असती तर महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. वाचा सविस्तर