खंत: पवारांच्या माध्यमातून राऊतांनी फडणवीस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, भाजप प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केली खंत


Advertisement

औरंगाबादएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक
  • सेना-भाजपतील आरोप प्रत्यारोपामुळे काँग्रेस – राष्ट्रवादीचा गेम यशस्वी

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीस मुख्यमंत्री असताना युती सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असा सनसनाटी गौप्यस्फोट करून राऊत नेमके शरद पवारांसाठी काम करतात की उद्धव ठाकरेंसाठी? शिवसेनेत दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, रामदास कदम, सुभाष देसाई व अनिल देसाई असताना राऊतच पुढे – पुढे का करतात, असा खोचक प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

Advertisement

करुणा मुंडेंची गळचेपी : राज्याचे समाजकल्याणमंत्री धनंजय मुंडे, आपण करुणा मुंडेंसोबत लिव्ह – इनमध्ये असून आपणास त्यांच्यापासून दोन मुले असल्याचे सांगतात. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार, उद्धव ठाकरे व सुप्रिया सुळे यांना करुणा मुंडेंचा कंठशोष ऐकू येत नाही का? धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवणे यापेक्षा लाजिरवाणी बाब दुसरी कुठली असूच शकत नाही, असे ते म्हणाले.

आमच्या म्हणजे शिवसेना-भाजपमधील आरोप-प्रत्यारोपामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा गेम यशस्वी होत असल्याची खंत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी येथे व्यक्त केली. आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यांच्यावर आरोप करतो, ते आमच्यावर करतात आणि काँग्रेस-राष्ट्रवादी मजा पाहत आहे. उद्धव ठाकरेंना केवळ मुख्यमंत्री म्हणून मिरवायचे असल्याने त्यांचा गेम यशस्वी होत आहे.

Advertisement

भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपाइं (आठवले), रासप, रयत, जनस्वराज्य पक्ष, शिवसंग्राम आदींना सोबत घेऊन लढणार आहे, असे ते म्हणाले. राजू शेट्टी भाजपसोबत येत आहेत या चर्चेविषयी िवचारले असता, ‘निष्ठा व सातत्य जपायचे असते. तेच मनुष्याला मोठे करते,’ असे वक्तव्य त्यांनी केले. मराठा अथवा ओबीसी आरक्षणासंबंधी शिवसेनेला काहीच कळत नाही. राज्यात २०१४ ते २०१९ दरम्यान सत्ता असताना जातनिहाय जनगणना व्हावी असा ठराव फडणवीस सरकारच्या काळात केला होता. इतर मागास वर्गाचे शिक्षण, नोकरीतील आरक्षण गेलेले नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ मध्येच उठतात आणि ओबीसीचा राग आळवतात, असेही ते म्हणले. या वेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे, प्रवीण घुगे, शहराध्यक्ष संजय केणेकर, प्रदेश उपाध्यक्ष बस्वराज मंगरूळे, बापू घडमोडे, लक्ष्मीकांत थेटे आदींची उपस्थिती होती.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here