क्रीडा स्पर्धा: राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा, छत्रपती संभाजीनगरच्या मुलींचा संघाला उपविजेतेपद


औरंगाबाद17 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धा उत्साहात पार पडली. या रोमांचक स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या मुलींच्या 14 वर्षांखालील संघाने उत्कृष्ट कामगिरी करत उपविजेतेपद आपल्या नावे केले. सांगली संघाने विजेतेपद पटकावले.

Advertisement

स्पर्धेत 14 वर्षे मुलींच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात छत्रपती संभाजीनगरच्या संघाने लातूर विभागाच्या संघावर 6 होमरनांनी शानदार विजय मिळवत फायनलमध्ये प्रवेश केला. छत्रपती संभाजीनगरच्या संघाने 9 आणि लातूर संघाने अवघे 2 होमरन काढले. त्यानंतर सांगली साेबत अंतिम सामना झाला.छत्रपती संभाजीनगर संघाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्रसन्ना पळणीटकर, राष्ट्रीय प्रशिक्षक गणेश बेटुदे यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर ज्योती रत्नपारखी (गायकवाड), मयूरी चव्हाण, ईश्वरी शिंदे हे प्रशिक्षक संघातील खेळाडूंकडून नियमित सराव करुन घेतात.

फायनलमध्ये सांगलीकडून झाला पराभव

Advertisement

स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचा अंतिम सामना कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सांगली जिल्हा संघाशी झाला. या फायनलमध्ये बलाढ्य सांगलीने छत्रपती संभाजीनगरच्या संघावर एकतर्फी 5-0 ने विजय मिळवत अजिंक्यपद राखले. संभाजीनगरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. उपविजेत्या संघाकडून स्नेहल पाटील, कांचन कुबडे, समीक्षा खराटे, आंचल हिवराळे यांचे प्रयत्न अपुरे पडले.

विजेता संघ पुढीलप्रमाणे

Advertisement

वैष्णवी भोंडे, स्नेहल पाटील, कांचन कुबडे, भूमिका परांडे, निशा गरड, समीक्षा खराटे, अदिती सरवटे, आंचल हिवराळे, सायली तांदळे, अभया जाधव. ‘आम्ही विजयासाठी प्रयत्न केले. मात्र आजचा दिवस आमच्यासाठी खराब व सांगलीसाठी चांगला होता. त्यांनी विजय मिळवला. पराभवाचे आम्ही कारण देणार नाही. तो स्विकारतो, पुढीच्या वेळी चांगली तयारी करणार आहोत, अशी प्रतिक्रिया वैष्णवी भोंडे, निशा गरड या खेळाडूंनी दिली.’

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement