क्रीडाविश्व: छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगणार राज्य बास्केटबॉल स्पर्धा, 1000 खेळाडू उतरणार मैदानात


छत्रपती संभाजीनगर9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

एम.एस.एम. बास्केटबॉल स्पोर्ट््स असोसिएशनतर्फे आयोजित व महा बास्केटबॉल संघटनेच्या मान्यतेने विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे महाराष्ट्र राज्य आंतर-जिल्हा युवा मुले-मुली अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे 19 ते 23 मे दरम्यान विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement

या स्पर्धेत जवळपास 1000 खेळाडू मैदानात उतरतील, अशी माहिती स्पर्धा आयोजन समितीचे अध्यक्ष गणेश कड व सचिव सचिन तत्तापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कड म्हणाले की, जिल्ह्यात सलग तिसऱ्यांदा राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना शिकण्याची मोठी संधी याठिकाणी मिळेल. स्पर्धेत 30 पेक्षा अधिक मुलामुलींचे संघ सहभागी होतील. खेळाडूंची निवास व भोजन व्यवस्था संकुलात करण्यात आली आहे. ही स्पर्धा संकुातील दोन इनडोअर व दाेन आऊटडोअर बास्केटबॉल मैदानावर प्रकाशझोतात होईल. प्रथम साखळी सामने व नंतर बाद फेरीने सामने होतील.

Advertisement

विजेत्यांना पदक व स्मृतिचिन्ह दिले जाईल. स्पर्धेच्या नियोजनासाठी विविध समित्या तयार करण्यात आल्या आहे. यावेळी राज्य संघटनेचे पदाधिकारी शहरात येणार आहेत. उद्घाटनाचा कार्यक्रम 18 तारखेला जाहीर करण्यात येईल. या स्पर्धेतून 31 मेदरम्यान राजस्थान येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यात येणार आहे. संघाचे शिबिर यजमान संघटनाच घेणार आहे.

नियाेजन समित्या पुढीलप्रमाणे

Advertisement
  • मुख्य आयोजन समिती : अध्यक्ष गणेश कड, उपाध्यक्षा बिजली आंबरे, उपाध्यक्षा मंदा कड, सचिव सचिन तत्तापुरे, सहसचिव प्रशांत बुरांडे.
  • मैदान समितीत : पंकज परदेशी, विजय पिंपळे, समाधान बेलेवार, अक्षय जैस्वाल, कृष्णा शर्मा.
  • निवास समिती : संदीप ढंगारे, गजानन दीक्षित, पूजा दुतोंडे, श्रद्धा भिकने, मिनल पठारे, आकाश काटे, विजय मालकर.
  • तांत्रिक समिती : खेमजी पटेल, महेश इंगळे, अजय सोनवणे.
  • वैद्यकिय समिती : डॉ. पायल ढवळे (एमजीएम स्पोर्ट््स फिजिओथेरपी)
  • भोजन समिती : विवेक देशमुख, धवल परिहार, विश्वास कड.



Source link

Advertisement