क्रिकेट सट्ट्याने घेतला जीव!: कर्जबाजारी तरूणाची गळफास लावून आत्महत्या, मुलगा गेल्याने विरहात आईने अंत्ययात्रेच्या दिवशी संपवले जीवन


नागपूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छापरू लोक, आंबेडकर चौकाजवळ, क्रिकेट बेटिंगमध्ये उद्ध्वस्त झालेल्या मुलाने रविवारी रात्री गळफास लावून आत्महत्त्या केली. त्याच्या विरहात आईने सोमवारी फिनाईल पिऊन आत्महत्त्या केल्याची हृदयद्रावक घटना नागपुरात घडली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. दिव्या नरेश वाघवानी व खितेन नरेश वाघवानी ही मृतांची नावे आहे.

Advertisement

मिळालेल्या माहिती नुसार नरेश वाघवानी यांचे लडकगंज परिसरात किराणा दुकान आहे. त्यांना खितेन व एक मुलगी आहे. मुलगी कार्यक्रमानिमित्त दिल्लीला गेली होती. खितेनची संगत चांगली नसल्याने त्याला क्रिकेट सट्ट्याचा नाद लागला. त्यात हरल्याने तो कर्जबाजारी झाला. कर्जबाजारीपणाला कंटाळून खितेनने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्त्या केली. त्यावेळी घरचे एका लग्नाला गेले होते.

लग्नाहून सर्व जण घरी आल्यानंतर खितेनने गळफास घेतल्याचे लक्षात आले. सोमवारी दुपारी दीड वाजता त्याची अंत्ययात्रा निघणार होती. मुलाच्या विरहात आईने सोमवारी सकाळी फिनाईल पिले. त्यात प्रकृती खालावल्याने दवाखान्यात भरती करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचाही मृत्यू झाला. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

AdvertisementSource link

Advertisement