क्रिकेटपटू क्विंटन डिकॉकला कन्यारत्न, फोटो शेअर करत दिली माहिती, मुलीचं नाव ठेवलं ‘कियारा’


Advertisement

Quinton De Kock’s Newborn Baby: भारताविरुद्ध सेंचुरियन (Centurion) कसोटी सामन्यात पराभव मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रीकाचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यावेळी कुटुंबाला अधिक वेळ देण्याकरता हा निर्णय डिकॉकने घेतल्याचं सांगितलं. त्यानंतर नुकतीच त्याला मुलगी झाली आहे. 

क्विंटन आणि त्याची पत्नी साशा (Sasha Hurly) यांनी नुकताच एका मुलीला जन्म दिला आहे. डिकॉकने त्याच्या मुलीचं नाव कियारा (Kiara) ठेवलं आहे, डिकॉकने इन्स्टाग्रामवर त्याचा, पत्नीता आणि मुलीचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्याच्या या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Advertisement

डिकॉकने नुकतच कसोट क्रिकेटला अलविदा केला असला तरी तो दक्षिण आफ्रीका संघासाठी वनडे आणि टी20 क्रिकेट खेळणार आहे. डिकॉक आयपीएलमध्येही मुंबई इंडियन्स संघातील एक महत्त्वाचा खेळाडू आहे. सध्या त्याला संघाने रिटेन केलं नसलं तरी नक्कीच लिलावामध्ये त्याला घेतील यात शंका नाही.

Advertisement

डिकॉकची कसोटी कारकिर्द

2014 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध डिकॉकने कसोटी क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेकडून पदार्पण केलं. या प्रकारात त्याने संघाचा कर्णधार म्हणूनही काम पाहिलं आहे. पण संघाच्या खराब प्रदर्शनामुळे त्याला लवकरच कर्णधारपद सोडावं लागलं. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून एकूण 54 कसोटी सामने खेळले असून त्यात 38.82 च्या सरासरीने 3 हजार 300 रन केले आहेत. यावेळी त्याने सहा शतकं आणि 22 अर्धशतकं झळकावली असून 141 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

Advertisement

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Advertisement



Source link

Advertisement