क्राईम: सराफ दुकानात सोने खरेदीसाठी गेलेल्या जेष्ठ महिलेचा मौल्यवान ऐवज चोरट्यांकडून लंपास; फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम: सराफ दुकानात सोने खरेदीसाठी गेलेल्या जेष्ठ महिलेचा मौल्यवान ऐवज चोरट्यांकडून लंपास; फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सोने खरेदीसाठी सराफ दुकानात गेलेल्या जेष्ठ महिलेच्या पर्समधील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १ लाख ८४ हजारांचा मौल्यवान ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी ६४ वर्षीय महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती पोलिसांनी रविवारी दिली.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला येरवडा परिसरात राहायला असून १० ऑगस्टला रविवार पेठेतील एका ज्वेलर्स दुकाना मध्ये सोने खरेदीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून पर्समधील २४ हजारांची रोख रोकड आणि दोन सोनसाखळ्या असा १ लाख ८४ हजारांचा ऐवज चोरुन नेला. संबधित महिलेला काही वेळानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जाउन तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एन. पवार पुढील तपास करीत आहेत.

भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

Advertisement

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करुन दुचाकीस्वार चोरट्यांनी भर दुपारी महिलेच्या गळ्यातील ७ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना १८ ऑगस्टला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास चंदननगरमधील संघर्ष चौकात घडली. यापकरणी माया शिंदे (वय ५०, रा. लोहगाव,पुणे) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माया लोहगाव परिसरात राहायला असून कामानिमित्त चंदननगरमधील संघर्ष चौकातून रस्त्याने जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७ हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. मायाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस उपनिरीक्षक अरिंवद कुमरे तपास करीत आहेत.

AdvertisementSource link

Advertisement