पुणे36 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी विश्वासाने भाग पाडून एका व्यक्तीची तीन लाख १५ हजार रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी व्हीपुष्पराज नावाचे युपीआयडी धारक व अज्ञात माेबाईल क्रमांक धारक व एचडीएफसी बँक खातेधारक यांच्यावर काेरेगाव पार्क पाेलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की घडले काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत उस्मान चाँदसाहेब कारभारी (वय-४६,रा.काेंढवा,पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार उस्मान कारभारी यांना गुगलद्वारे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणुक करण्यासाठी व्हेराब्राेर्कस नावाने एक लिंक आली त्यावरुन व्हेरा ब्राेकर नावाचे अॅप मधून व्हीपुष्पराज या युपीआय आयडी व एका व्हाॅटसअॅप माेबाईल क्रमांक धारक तसेच स्वरुपीनी नावाच्या एचडीएफसी बँक खातेधारक यांनी सर्वांनी मिळून त्यांची अाेळख लपवली.
त्याआधारे तक्रारदार यांना नफा म्हणून दरराेज पाच टक्के रक्कम परत देण्याचे अमिष दाखवून नफा परत जमा झाल्याचे भासवून तक्रारदार यांच्या खात्यावरुन १५ हजार व त्यांचे मुलीचे खात्यावरुन तीन लाख रुपये असे एकूण तीन लाख १५ हजार रुपये भरावयास लावून ते पैसे परत न करता आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत काेरेगाव पार्क पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरीक्षक एस वेताळ पुढील तपास करत आहे.
डाॅक्टरची दाेन लाखांची फसवणुक
कात्रज परिसरातील दत्तनगर येथे राहणारे डाॅ.अशाेक फुलचंद लाेढा (वय-६०) यांना त्यांचे अाेळखीचे भिमाजी पटेल यांनी फाेन करुन बँगलाेर येथे राहणारे फियाज माेकाशी त्यांचे मित्र असून त्यांचे अाेळखीचे काेल्हापूर येथील हरिष स्वामी (वय-४०) यांना अाईचे उपचारासाठी दाेन लाख रुपयांची गरज अाहे. ते त्यांची गाडी सिक्युरीटी म्हणून ठेवण्यास तयार अाहे. त्याप्रमाणे अाराेपी हरिष स्वामी त्यांचेकडील सँट्राे कार घेवून येवुन ती डाॅक्टरांकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून दाेन लाख रुपये घेऊन गेले. मात्र, त्यानंतर त्यांनी फाेन बंद करुन ठेवत फसवणुक केली अाहे. याबाबत सहकारनगर पाेलीस पुढील तपास करत अाहे.