पुणेएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
पुणे शहरातील एका व्यावसायिकाकडे तीन ते चार दिवस काम करून त्याची माहिती गोळा करीत त्यांचा अपहरणाचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. कात्रज महामार्गावर त्याची मोटार अडवून चाकूच्या धाकाने मारहाण करून अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यानंतर व्हॉटसअॅप कॉलद्वारे व्यावसायिकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
तिघांना घेतले ताब्यात
पवन मधुकर कांबळे (वय- 22,), कृष्णा भिमराव भाबट (वय- 19, धायरी) आणि सौरभ संजय बनसोडे (वय- 25) अशी अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. याप्रकरणी अभिजीत कृष्णा भोळे( वय – 35) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
चाकूच्या धाकाने मारहाण
तक्रारदार अभिजीत भोळे यांचा ट्रान्सफॉर्मर बनविण्याचा व्यवसाय असून ते पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे कामाच्या बहाण्याने 4 जणांनी माहिती एकत्रित केली. त्यानंतर आरोपींनी साथीदारांच्या मदतीने भोळे यांचा सहा मे रोजी अपहरणाचा प्रयत्न केला. चाकूच्या धाकाने त्यांना मारहाण केली. त्यांनी सुटका करून घेतल्यानंतर आरोपींनी 12 मे रोजी दोन व्हॉट्सअपद्वारे फोन करुन त्यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागितली पैसे न दिल्यास कुटूंबाला व तुम्हाला जीवे मारून टाकेल, अशी धमकीही आरोपींनी दिली. त्यानंतर पोलिसांनी सदर तिन्ही आरोपीना अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, पोलिस उपनिरीक्षक धीरज गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.