क्राईम: लष्कराच्या बीआरओ लेखी परीक्षेत डमी विद्यार्थ्यांचे रॅकेट उघडकीस, पाेलिस ठाण्यात 4 जणांवर गुन्हा दाखल


पुणे7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

भारतीय लष्कराच्या बाॅर्डर राेड ऑरगनायझेन (बीआरओ) लेखी परीक्षेत डमी विद्यार्थी बसवून पेपर दिले जात असल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पाेलिस ठाण्यात चार आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आराेपींना अटक करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी बुधवारी दिली आहे.

Advertisement

रामपती विश्वंभर दयाल (वय 23,रा.उत्तर प्रदेश), परमजित विजयपाल सिंग (32, रा.उत्तरप्रदेश) व साेन सुरेश (वय 22, रा.हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. त्यांच्यासह अमन सुरेश (वय 19, रा.हरियाणा) या आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बीआरओचे सहाय्यक प्रशासन अधिकारी अरुणकुमार एस. व्ही. (वय 46, रा. धानाेरी, पुणे) यांनी आराेपी विराेधात पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

डमी विद्यार्थ्यांना बसवले

Advertisement

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या संरक्षण विभागा मार्फेत ग्रीफ बाॅर्डर राेड ऑर्गनायझेशन यांच्या मार्फत पुण्यातील धानाेरी परिसरात बीआरओ स्कुल अँड सेंटर येथे मंगळवारी लेखी परीक्षा घेण्यात येत हाेती. त्यावेळी परमजीत सिंग याने त्याच्या जागेवर परीक्षेस रामपती दयाल यास बसवले हाेते. तर, अमन सुरेश याने त्याच्या जागी साेनु सुरेश याला परीक्षेसाठी डमी विद्यार्थी म्हणून बसवले हाेते.

ताेतायागिरी करुन फसवणुक

Advertisement

परंतु परीक्षा हाॅल तिकिट तपासणी दरम्यान ही बाब निरीक्षकाच्या लक्षात आली आणि त्यांचे कारनामे उघडकीस आले. याप्रकरणी ताेतायागिरी करुन फसवणुक केल्याने आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्रांतवाडी पाेलिस ठाण्याचे पाेलिस उपनिरीक्षक एस. चाैधरी याबाबत पुढील तपास करत आहे.Source link

Advertisement