क्राईम: यूटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून नऊ लाखांचा ऑनलाईन गंडा; पुण्यात पुन्हा फसवणूक


पुणे20 मिनिटांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

व्हॉट्सअ‍ॅप व टेलिग्रामच्या माध्यमातून संर्पक करुन हडपसर परिसरातील फुरसुंगी येथे राहणाऱ्या विक्रम बाळासाहेब जमदाडे (वय-29) यास तीन युटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगून त्याची ऑनलाइन आठ लाख 97 हजार रुपयांची फसवणुक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Advertisement

याप्रकरणी तीन अनाेळखी आराेपी विराेधात हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली आहे.

शुभांगी रुथ, गाैतम गाेल्ड फायनान्स व आराध्या अग्रवाल अशी गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे. सदरचा प्रकार 14 ते 31 मार्च दरम्यान घडलेला आहे. तक्रारदार विक्रम जमदाडे यांना संबंधित आराेपींनी संगनमत करुन कट रचून व्हाटसअप तसेच टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून संर्पक साधला. त्यांचे साेबत चॅटिंगच्या माध्यमातून संभाषण करुन त्यांना तीन युटयुब चॅनल सबस्क्राइव करण्यास सांगुन आराेपींनी त्यांचे युपीआय आयडी व बँक खात्यावर वेळाेवेळी एकूण आठ लाख 97 हजार रुपये भरण्यास सांगून त्यांनी गुंतवलेले पैसे परत न करता सदर रकमेची फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास हडपसर पोलिस करत आहे.

Advertisement

सहा लाखांची फसवणूक

पतीने संगनमत करुन कट रचून पत्नीसाेबत काैटुंबीक कारणावरुन वाद केला. त्यानंतर तिला घराबाहेर काढून तिचे घरात राहिलेले चेकबुकचा वापर करुन इतर आराेपींनी संगनमत करुन पत्नीची बनावट सही करुन, बनावट सही असलेल्या चेकचा वापर करुन तिच्या खात्यातून परस्पर पाच लाख 85 हजार रुपये काढून तिची फसवणूक केली.तर, सासु व सासरे यांनी सुनेच्या बँक खात्यातील रक्कम त्यांचे बँक खात्यावर वळते करुन फसवणू​क केली. महिलेने पैशाबाबत सासरचे व्यक्तींना फाेन केला असून तिला धमकी देण्यात आला आहे. याप्रकरणी 35 वर्षीय महिलेचा पती, सासु, सासरे व दीर यांचेवर काेंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

AdvertisementSource link

Advertisement