क्राईम: पूर्वीच्या वादाच्या रागातून दोघांना कोयत्याने वार करून केले गंभीर जखमी


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या वादाच्या रागातून टोळक्याने महर्षि नगर परिसरात दोघांवर वार करुन गंभीररित्या जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याशिवाय त्याच्या मित्राला बांबूने मारहाण केल्याची घटना घडली आहे.

Advertisement

अनिकेत खाडे (रा. गुलटेकडी,पुणे ),दादा मोरे, सार्थक शिंदे (दोघेही रा. महर्षीनगर,पुणे ), सिद्धार्थ (पुर्ण नाव नाही), अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यां आरोपीची नावे आहेत. मंदार गायकवाड (वय ३५ रा. महर्षीनगर,पुणे) असे गंभीर जखमी तरुणचे नाव आहे.

धारदार कोयत्याने वार

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार गायकवाड आणि त्याचे मित्र रोहन काकडे, आशिष बडदे हे १८ मे रोजी रात्री महर्षी नगर येथे आयपीएलचा सामना पाहत होते. त्यावेळी पूर्वीच्या वादाच्या रागातून आरोपी सार्थकने त्याच्या साथीदारांना एकत्रित केले.

आरोपी सिद्धार्थने मंदारच्या हातावर धारदार कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच सतीश काकडे याला मारहाण करीत रोहन काकडे याच्यावर कोयत्याने वार केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमेश कारके पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

घरफोडी गुन्ह्यात दोन लाखांंचा ऐवज चोरीस

पुण्यातील बाणेरमधील गगणगिरी निवासात घराचा दरवाजा उघडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजारांची रोकड असा दोन लाख १६ हजारांचा ऐवज चोरुन नेल्याचा प्रकार घडला आहे. .

Advertisement

अक्षय देशपांडे (वय- ३५, रा.बाणेर,पुणे) यांनी याबाबत अनोळखी आरोपी विरोधात चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.ही घटना २८ एप्रिलला घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय देशपांडे हे कुटूंबियासह बाणेरमधील गगनगिरी सोसायटीत राहाण्यास आहे. २८ एप्रिलला सकाळी कामानिमित्त ते घराबाहेर गेलेला असताना, चोरट्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून चोरी केली. त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने आणि २० हजारांच्या रोकडचा समावेश आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रुपेश टेमगिरे पुढील तपास करीत आहेत.

AdvertisementSource link

Advertisement