क्राईम: पुण्यात व्यावसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 17 लाख रुपयांचा गंडा; बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

क्राईम: पुण्यात व्यावसायात गुंतवणुकीच्या आमिषाने 17 लाख रुपयांचा गंडा; बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल


पुणेएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

ग्राफोलोजी व्यावसायामध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, एका व्यक्तीची तब्बल 17 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मनीष पांडे (राहणार- वानवडी ,पुणे )या आरोपी विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

याबाबत ब्रिजेश अच्युतन नायर (वय -42 ,राहणार – वाघोली ,पुणे )यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना जून 2021 ते ऑगस्ट 2022 यादरम्यान घडलेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,तक्रारदार यांना आरोपी मनीष पांडे यानी ग्राफॉलॉजी व्यवसाय मध्ये गुंतवणूक केल्यास चांगल्या प्रकारे परतावा मिळेल असे आमिष दाखवले. तसेच पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी बिझनेस कार्यालयात ग्राफ प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ऑफिस सुरू करून तक्रारदार यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यांना दुबईतील ग्राफोलॉजी कौशल्याबाबतचे व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यासाठी व व्यवसायातील खर्चासाठी एकूण 17 लाख 25 हजार रुपये खर्च करण्यास भाग पाडण्यात आले. सदरची रक्कम तक्रारदार यांनी मागितली असता, त्यांना ती परत न करता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. आरोपीकडे वारंवार पैशांची मागणी करूनही तो पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्याने ,अखेर तक्रारदार यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस धनवडे याबाबत पुढील तपास करत आहे.

साडेतीन लाखांची फसवणूक

Advertisement

कोंढवा परिसरातील गोकुळनगर येथील शिक्षक सोसायटीत राहणाऱ्या वरून दिनेश कुमार पांडे (वय -31) या तरुणाला आज्ञात व्यक्तीने मोबाईलवर संपर्क साधून पार्ट टाइम नोकरी देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी टेलिग्रामच्या माध्यमातून वेगवेगळे टास्क पूर्ण करून घेऊन त्याचा जास्त मोबदला देऊ सांगून वेळोवेळी तीन लाख 51 हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडून सदर रकमेचा कोणताही परतावा किंवा त्यावरील नफा न देता, फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांक धारक तसेच विविध बँक खातेदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Advertisement