क्राईम: पुण्यात भरदिवसा फायरिंग, खून प्रकरणातील संशयित आरोपीला साताऱ्यातून ठोकल्या बेड्या!


पुणे9 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे जुन्या वादातून भरदिवसा फायरिंग करुन कृष्णा ऊर्फ साेन्या तापकीर याचा माेटारसायकलवरुन आलेल्या दाेनजणांनी गाेळीबार करत खून करुन पसार झाल्याची घटना २२ मे राेजी घडली हाेती. या गुन्ह्यात पसार झालेल्या दाेन आराेपींना पिंपरी चिंचवड पोलीसांच्या गुन्हे शाखा युनिट एकचे पथकाने सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यात सरताळा येथून अटक करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गाेरे यांनी दिली आहे.

Advertisement

साैरभ ऊर्फ साेन्या बाळासाहेब पानसरे (वय-२३,रा.माेईगाव, ता.खेड,पुणे) असे आराेपीचे नाव आहे. त्याच्यासह एका विधीसंघर्षीत बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी आराेपींवर चिखली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हा गुन्हा घडल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे पथकाचे पोलीस निरीक्षक संताेष पाटील यांचे पथक तपास करत हाेते. यावेळी पोलीसांनी दाेन तपास पथके तयार करुन पुनावळे, माेईगाव, यवत, दाैंड, सुपा, बारामती आदी भागात रवाना केली हाेती. आराेपींचा पोलीस पथके शाेध घेत असताना, खबऱ्या व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीसांना सदर गुन्हयातील पाहिजे आराेपी हे सातारा जिल्हयातील सरताळा परिसरात असल्याची माहिती मिळाली.

Advertisement

त्यानुसार सदर परिसरातील आसपासचे भागात आराेपींचा पोलीस शाेध घेत असताना, कॅनलच्या लगत असलेल्या रज इंडियन व्हेज नाॅनव्हेज हाॅटेल जवळ गुन्हयातील पाहिजे आराेपी हे केटीएम दुचाकीवरुन येताना पोलीसांना दिसले. पोलीसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता, ते पळून जाऊ लागल्याने पोलीसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी व साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चाैबे, सहपोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी , पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गेरे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत अमृतकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संताेष पाटील , पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पोलीस अंमलदार बाळासाहेब कोकाटे, मनोजकुमार कमले, महादेव जावळे, साेमनाथ बाेऱ्हाडे, फारुक मुल्ला, अमित खानविलकर, सचिन माेरे, उमाकंत सरवदे, प्रमाेद हिराळकर, अजित रुपनवर, विशाल भाेईर, माराेती जायभाये, तानाजी पानसरे, नागेश माळी यांचे पथकाने केली आहे.

Advertisement



Source link

Advertisement