क्राईम: पुण्यात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांना अटक; डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

क्राईम: पुण्यात दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांना अटक; डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल


पुणे14 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या चार जणांना डेक्कन पोलिसांनी अटक केली असून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.

Advertisement

जसपालसिंग जपानसिंग जुन्नी (वय-20, रा.भारत नगर, पिंपरी चिंचवड), कुलदीपसिंग युवराजसिंग जुन्नी (वय-18, पाटील इस्टेट, शिवाजीनगर), नसीबसिंग रणजितसिंग दुधानी (वय-18, न्यू बुधवार पेठ, सोलापूर), गौरव शंकर राठोड (वय-19, गोल्डन चौक, चाकण) तसेच 15 वर्षाच्या एका मुलास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लॉ कॉलेज रस्त्यावरील बिल्वकुंज बिल्डिंग येथे काही जण दरोड्याची टाकण्याची तयारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून घातक शस्त्र, हत्यार जप्त करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय सावंत करत आहेत.

Advertisement

3 लाख 42 हजारांचा मुद्देमाल लंपास

पुणे शहरातील खराडी भागातील एका बंद सदनिकेचे लॉक तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिण्यासह 3 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी रणजित देवसिंग ठाकूर (वय-51, रा. थिटे, वस्ती, खराडी,पुणे) यांनी चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजित ठाकूर यांचा सदनिकेचे लॉक तोडून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम मधील कपाटातून 52 हजार 500 रुपयांची रोख रक्कम, 2 लाख 72 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, 18 हजार किमतीचे चांदीचे दागिने असा 3 लाख 42 हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस पालवे करत आहेत.

AdvertisementSource link

Advertisement