क्राईम: पत्रकाराला धमकी देणाऱ्या ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल


अमरावती3 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील थिलोरी ते गणेशपुर रस्त्यावर थिलोरी गावाबाहेर पूलाचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याची लेखी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे एका माध्यमात बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित ठेकेदार यांनी त्या माध्यमाचे प्रतिनिधी किरण होले यांना फोन करुन धमकी दिली. दरम्यान त्यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

शासनाच्यावतीने या पुलाच्या बांधकामासाठी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र संबंधित ठेकेदार बोबडे हे या पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करत असून त्यासाठी लोखंड, सिमेंट आदी साहित्य निकृष्ट दर्जांचे वापरण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्याआधारे ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत थिलोरी येथील रहिवाशी आकाश वाकपांजर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग दर्यापुरकडे लेखी स्वरूपात तक्रारही केली होती. त्या तक्रारीच्या आधारेच बातमी प्रकाशित करण्यात आली. दरम्यान माझ्या पुलाच्या सुरू असलेल्या कामासंदर्भात बातमी का लावली, असे म्हणत फोनवर व व्हाट्सअँपवर मेसेज करून होले यांना जीवे मारण्याची धमकी दिली गेली. त्यामुळे होले यांनी मध्यरात्री दर्यापूर पोलिसात संबंधित ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी ठेकेदारावर गुन्हा दाखल केला आहे.Source link

Advertisement