पुणे17 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाला ऑनलाइन नोकरी देण्याचे आमिष दाखवून टेलिग्रामचे टास्क पूर्ण करण्यास सांगून त्याच्याकडून पावणेदहा लाख रुपये बँक खात्यावर घेत, भामट्यांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिलेली आहे.
याबाबत शुभम कुमार साहू (वय -28 ,राहणार -पठारेनगर ,पुणे )याने अज्ञात मोबाईल क्रमांक धारक तसेच अनु नावाचे टेलिग्राम आयडी धारक यांच्या विरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
हा प्रकार 3 एप्रिल 2022 ते 2023 यादरम्यान ऑनलाइन स्वरूपात घडलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,शुभम साहू हा नोकरीच्या शोधात होता. यासाठी ऑनलाइन तो काम पाहत असताना, त्याला संबंधित आरोपींनी संपर्क करून नोकरी देण्याचे आमिष दाखवले. टेलिग्राम वरील वेगवेगळे टास्क पूर्ण केल्यास दररोज वेगवेगळे टास्क प्रमाणे पैसे मिळतील असे सांगून त्याला आमिष दाखवण्यात आले.
त्यानुसार त्याच्याकडून पावणेदहा लाख रुपये आरोपींनी बँक अकाउंटवर घेऊन त्याची फसवणूक केली आहे. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यु जानकर पुढील तपास करत आहे.
नोकरीच्या आमिषाने साडेतीन लाखांची फसवणूक
कोरेगाव पार्क याठिकाणी राहणाऱ्या कीर्ती सत्यनारायण पुरहित ( वय 40) यांना अज्ञात मोबाईल क्रमांक धारकांनी संपर्क करून, नोकरी देण्याचे आमिष दाखवले.त्यांना वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगून आरोपींनी बँक खात्यावर एकूण तीन लाख 67 हजार रुपये घेऊन त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी न देता तसेच गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक करण्यात आली आहे.
याबाबत कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 2 एप्रिल 2022 ते 3 एप्रिल 2022 यादरम्यान घडलेला आहे.