पुणे12 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
पुणे पोलिस दलातील एका निलंबीत पोलिस कर्मचाऱ्याने शेजारी राहणाऱ्या एका 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार कॅम्प परिसरातील एम.जी.रस्त्यावर घडलेला आहे. याप्रकरणी निलंबित पोलिस अधिकाऱ्या विराेधात लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली आहे.
अरफाज आरिफ शेख (वय-27) या निलंबीत पोलिस कर्मचाऱ्यासह एका महिले विराेधात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारहाण झालेले अमीर हनीफ पटेल (वय-६५) यांनी आराेपी विराेधात तक्रार दाखल केली आहे. सदरची घटना 17 मे राेजी घडलेली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमीर पटेल हे त्यांच्या घरासमाेरील अंगणात 17 मे राेजी सायंकाळी बसले हाेते. त्यावेळी पटेल यांचे घरामागे राहणाऱ्या महिलेने त्यांना माझे फाेटाे का काढले?, तुम्हाला माझे फाेटाे काढण्याचा अधिकार काेणी दिला अशी विचारणा केली. यावेळी निलंबीत पोलिस कर्मचारी अरफाज शेखने मी पोलिस आहे, मी तुम्हाला साेडणार नाही असे म्हणत लाकडी बांबुने ज्येष्ठ नागरिक व त्यांच्या मुलास बेदम मारहाण केली. याप्रकरणी आराेपी विराेधात लष्कर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस बनसुडे करत आहे.
सीसीटीव्हीत फाेटाे घेतल्याचा जाब विचारल्याने मारहाण
याप्रकरणी कॅम्प परिसरात राहणाऱ्या संबंधित 27 वर्षीय महिलेने आराेपी अमीर पटेल व कलंदर अमिर पटेल यांनी त्यांचे सीसीटीव्हीत फाेटाे घेतला. ताे शेअर करुन खाेटी माहिती सांगितली त्यामुळे त्याचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार महिला व तिचे पती निलंबित पोलिस कर्मचारी अरफाज शेख हे पटेल यांच्याकडे गेले असताना, त्यांनी कुऱ्हाड घेऊन येवून महिलेचा पतीचे अंगावर दाेनवेळा मारण्यास फिरवली. त्यावेळी कलंदर याने बांबुने महिलेच्या पतीस मारुन शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत लष्कर पोलिस ठाण्यात दाेन आराेपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.