क्राईम: किशोर आवारे खून प्रकरणात सूत्रधारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणीसाठी जाहीर मोर्चा


पुणे4 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खुनात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके, त्यांचा भाऊ सुधाकर शेळके,संदीप गराडे या उर्वरित आरोपींना अटक करावी. त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली नाही हे न्यायास धरून नाही.

Advertisement

या गुन्ह्यातील मारेकरी आणि संशयित आरोपी यांना अटक करण्यात यावी.खऱ्या नराधमास फशीची शिक्षा द्या. मावळ तालुक्यात अनेक आमदार होऊन गेले पण सध्याचे विद्यमान आमदार यांनी त्यांचे मुळ रूप दाखवून दिले, असा आरोप किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी गुरवारी व्यक्त केला.

किशोर आवारे यांच्या खुनातील सूत्रधारांना अटक करावी या मागणीसाठी तळेगाव दाभाडे येथे जाहीर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी किशोर भाऊ अमर रहे, न्याय मिळालाच पाहिजे, खऱ्या सूत्रधारांना अटक करा, गुन्हेगारांना फाशी झाली पाहिजे, पाच दिवस झाले खऱ्या गुन्हेगारांना अटक का केली जात नाही अशा घोषणा यावेळी नागरिकांनी दिल्या. किशोर आवारे याने कोरोना काळात गरीब नागरिकांना मोठी मदत केली आहे. गरजू लोकांना सदैव मदतीसाठी तत्पर होता. ज्याने गुन्हा केला त्याला फाशी झाली पाहिजे अन्यथा आम्ही आत्मदहन करू असा इशारा महिलांनी यावेळी दिला.

Advertisement

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे म्हणाले, या घटनेमुळे मावळ मध्ये सामाजिक काम करणाऱ्यांना काळीमा फासणारी घटना आहे. राजकीय भूमिकेतून याकडे न पाहता सामाजिक दृष्टीने पाहिले जावे. किशोर आवारे यांच्या जाण्यामुळे सामाजिक नुकसान झाले आहे.पोलिसांनी योग्य तपास करून न्याय देण्याचे काम करावे. पोलीस तपासावर आमचा विश्वास आहे. त्यांनी लवकरात लवकर सूत्रधार जेरबंद करावा.

भाजप पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले, किशोर आवारे यांची भ्याड हत्या झाली आहे. मागील काही वर्षापासून त्यांचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने त्यांच्यावर दुर्देवी हल्ला झाला आहे. त्यांच्या जाण्यामुळे अनेकांचा आसरा गेला आहे. पोलिसांना याबाबत निवेदन दिले आहे त्यांनी ताबडतोब याबाबत सखोल चौकशी करावी. जे चित्र रंगवले जात आहे ते चुकीचे आहे. या खुनात मास्टर माईंड कोण याचा शोध घेऊन कडक कारवाई करावी. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांना याबाबत माहिती देऊन ठोस कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

भाई चव्हाण म्हणाले, कायदावर आमचा विश्वास आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि अपेक्षा केली की , सर्वसामान्य प्रमाणे जे संशयित आरोपी त्यांच्यावर कारवाई केली जाईल. किशोर आवारे गेल्यावर शक्ती प्रदर्शन करून कोणाचे गुन्हे लपणार नाही. शांततेच्या मार्गाने लढा देत असताना कोण कट कारस्थान करून हल्ला करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याची अपेक्षा आहे. आमदार स्वतःच आपण निर्दोष असल्याचे सांगत आहे. तपास यंत्रणांना तपास करून सुत्रधारांवर कारवाई करू दे. पोलिसांवर कोण दबाव टाकत असेल तर आम्ही त्याचा निषेध करू. एक महिन्याची मुदत पोलिसांना देतो त्यांनी सुत्रधारवर कारवाई करावी अन्यथा मोठा मोर्चा परत काढू.



Source link

Advertisement