क्राईम: किरकोळ वादातून टोळक्याने केली तरुणास बेदम मारहाण; पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसांत गुन्हा दाखल


पुणे8 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

गाेळीबार आणि खुनाच्या प्रयत्नातील एका सराईत आराेपीस ‘टपरी फाेडणारा चाेर’ म्हणाल्याच्या रागातून एका टाेळक्याने तरुणास बेदम मारहाण केल्याचा प्रकार वारजे माळवाडी परिसरात अहिरे गाव याठिकाणी घडला आहे. याप्रकरणी सहा आराेपीवर वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

Advertisement

पपुल्या, 16 वर्षाचा एका विधीसंघर्षित बालक, बाब्या, नंदया, मारत्या व राहुल विठ्ठल वांजळे (वय-24) असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपीची नावे असून वांजळे यास अटक करण्यात आली आहे. याबाबत अजहर मुर्तजा खान (वय-37) यांनी आराेपी विराेधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अजहर खान यांचा भाचा अब्दुल जैद हबीब अहमद खान (वय-19) यास सदर परिसरातील गुन्हेगार पपुल्या याचे सांगण्यावरुन त्याचे साथीदार बाब्या व नंदया यांनी पुण्यातील कर्वेनगर येथून पकडून अहिरे गावातील स्वरा हाईट याठिकाणी एका इमारतीच्या टेरेसेवर नेले.

Advertisement

त्याठिकाणी पपुल्या याना त्यास ताे खुनाचा प्रयत्न व गाेळीबार करणारा माेठा गुन्हेगार असताना, जैद याने त्याला ‘टपरी फाेडणारा चाेर’ म्हटल्याचे कारणावरुन इतर साथीदारा साेबत मिळून गैरकायद्याची मंडळी जमा करुन जैद यास ठार मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन त्याचे अंगावर नाचून डाेके, पाेट व इतर ठिकाणी गंभीर जखमा केल्या आहे. याबाबत वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक एस पार्वे पुढील तपास करत आहे.

भांडणाचे रागातून तरुणास काेयत्याने मारहाण

Advertisement

उत्तमनगर परिसरात आकाश अनंता किंडरे (वय-26) हा तरुण त्याच्या मित्रांसाेबत थांबलेला असताना चार ते पाचजण माेटारसायकलवर हातात काेयते व लाकडी बांबु घेऊन त्याठिकाणी आले. चार दिवसांपूर्वी किंडरे याचे परिसरात झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन आराेपींनी आम्ही येथील भाई आहे असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्यास काेयत्याने मारहाण करुन तेथील लाेकांना बाबुंने मारहाण केली. तसेच जवळील चिकन व हेअर कटिंगच्या दुकानावर दगड टाकून दुकानाचे नुकसान करुन लाेकांना शिवीगाळ व दमदाटी केल्याने पोलिसांनी पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. गणेश वाघमारे, प्रतिक नलावडे, सानीग गटे, सुजल भाटी, अनमाेल बुरा असे गुन्हा दाखल झालेल्या आराेपींची नावे आहे.



Source link

Advertisement