क्राईम: आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी

क्राईम: आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रिपब्लिकन जनशक्तीची मागणी


पुणे7 तासांपूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

पुणे महानगरपालिका मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांना धमकी देणाऱ्या आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत शिवाजीनगर पोलीस स्स्टेशन े पोलीस निरिक्षक यांना रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे व संघटनेच्या कार्यक्कर्त्यानी निवेदन देत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे .

Advertisement

पुण्येश्वर मंदिराच्या प्रश्नाबाबत पुणे महानगरपालिकेच्या मुख्य गेटसमोर काही संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आमदार नितेश राणे, आमदार महेश लांडगे, मिलिंद एकबोटे, धीरज घाटे आदी नेते उपस्थित होते. वरील निषेधादरम्यान चिथावणीखोर भाषणे करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला आहे.

तसेच आमदार नितेश राणे यांनी पुणे महानगरपालिकेचे मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांच्याबद्दल खालच्या पातळीवर बोलले त्यांच्या भाषणात त्याचा गोषवारा देण्यात आला आहे .आहे. या भाषणाची व्हिडीओ क्लीप बंदोबस्तात असणाऱ्या पोलीसांकडे व माध्यमांच्याकडे उपलब्ध आहे. सदर प्रकरणी पुण्यश्वर मंदिराचा प्रश्न हा न्याय प्रविष्ठ असून सदर ठिकाणचे बांधकाम पाडण्याची नियमबाहय मागणी जाणिवपूर्वक काही संघटनांकडून केली जात आहे.

Advertisement

सदरचे बांधकाम पाडता येणार नाही असे पुणे महानगरपालिकेकडून स्पष्टपणाने सांगुणही हे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करत आहेत आणि ते बांधकाम पाडले जात नाही याचा राग मनात ठेवुन आमदार नितेश राणे पुणे महानगरपालिकेचे मुख्य बांधकाम अभियंता प्रशांत वाघमारे यांना व्यक्तीगत दोष देत त्यांना मारण्याची धमकी देवुन त्यांचा अवमान केला आहे.

या घटनेचा आम्ही या निवेदनाद्वारे जाहिर निषेध करत असून आमदार नितेश राणे याच्यावर कायदेशिर पोलीसांनी कारवाई करून अटक करावी व या पुढे नितेश राणे याला पुणे शहरामध्ये कोणत्याही कार्यक्रमात भाषण करण्यास परवानगी देवु नये. तसेच प्रशांत वाघमारे यांना सामाजिक संघटनांकडून धोका निर्माण होवु शकतो म्हणून तात्काळ पोलीस सुरक्षा देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . यावेळी रिपब्लिकन जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे ,पुणे जिल्हा अध्यक्ष माऊली भोसले, विशाल घाडगे अनिल अवसरमल ,सविता गायकवाड यासह रिपब्लिकन जनशक्तीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

AdvertisementSource link

Advertisement