कोल्हापूरमध्ये एकाचवेळी 8 जणांना जन्मठेपेची शिक्षा: अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा सूपारी देऊन केला होता खून


कोल्हापूरएका तासापूर्वी

Advertisement
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून कट रचून अपहरण करून लाईन बाजार येथील नितीन पडवळे याचा शिर धडावेगळे करून आंबा परिसरात नागझरी येथे निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी आज जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी 8 आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी 50 हजार रुपयांची शिक्षा सुनावली. तर अन्य 2 आरोपी फरार असून एक आरोपी मृत आहे. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये 2 महिलांचा समावेश आहे.

Advertisement

काय आहे प्रकरण?

12 जानेवारी 2011 मध्ये घडलेल्या गुन्ह्यातील खटल्याचा आज, मंगळवारी (दि. 24) जिल्हा व सत्र न्यायालयात निकाल लागला. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीच्या खुनाची सुपारी पत्नी आणि तिच्या प्रियकराने दिली होती. नितीन बाबासाहेब पडवळे (वय 35, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांचे 11 जणांनी अपहरण करून शिर धडावेगळे करून निर्घृण खून केला. त्यानंतर विशाळगड रोडवर मानोली गावच्या जंगलात मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती.

Advertisement

सुपारी देवून खून

लीना नितीन पडवळे (वय 41, रा. लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) आणि रवी रमेश माने (38, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका, कोल्हापूर) या दोघांचे प्रेमसंबंध होते. प्रेम संबंधात अडथळा ठरत असलेला लीनाचा पती नितीन पडवळे याचा खून करण्याची सुपारी या दोघांनी कावळा नाका परिसरात दिलीप व्यंकटेश दुधाळे (40) याला दिली. आरोपींनी नितीन पडवळे अपहरण करुन त्यानंतर वाठार-बोरपाडळे मार्गे विशाळगड रोडवर मानोली गावच्या जंगलात वाघझरा येथे त्याचे शिर धडावेगळे करून मृतदेह दरीत फेकला होता.

Advertisement

या प्रकरणी रवी रमेश माने, विजय रघुनाथ शिंदे, किशोर दत्ता माने, आकाश उर्फ अक्षय सिताराम वाघमारे, दिलीप वेंकटेश दुधाळे, अमित चंद्रसेन शिंदे (मृत), लिना नितीन पडवळे, गीतांजली विरुपाक्ष मेनशी, सतीश भिमसिंग वडर ( फरारी), इंद्रजीत उर्फ चिल्या रमेश बनसोडे (फरारी) व मनेश साहेबांना कुचीकोरवी अशी आरोपींची नावे आहेत.

सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य

Advertisement

सरकारी वकील एस. एम. पाटील यांनी न्यायालयात 21 आरोपी तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा सत्र न्यायाधीश (3) एस. एस. तांबे यांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्यात 8 आरोपींना दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement