कोलकाता नाईट रायडर्सला बसला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आयपीएल मधून बाहेर

कोलकाता नाईट रायडर्सला बसला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आयपीएल मधून बाहेर
कोलकाता नाईट रायडर्सला बसला मोठा धक्का; ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आयपीएल मधून बाहेर

आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी फेरीतील लढती अखेरच्या टप्प्यावर आल्या असताना केकेआर संघाला मोठा झटका बसला आहे. जाणून घ्या अपडेट…कोलकाता नाईट रायडर्सला आयपीएल २०२२च्या अखेरच्या टप्प्यात मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य जलद गोलंदाज पॅट कमिंन्स आयपीएलमधून बाहेर झालाय. कमिंन्सला दुखापत झाली आहे आणि तो ऑस्ट्रेलियाता परत जाणार आहे. ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार असलेल्या कमिंन्सला पुढील महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्याआधी फिटनेस मिळवण्यासाठी तो सिडनला जाणार आहे. केकेआरने कमिंन्सला ७.२५ कोटींना खरेदी केले होते.

कमिंन्सबाबत आलेल्या अपडेटनुसार त्याला फिट होण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी लागू शकतो. कसोटी संघाच्या कर्णधारासोबत कमिंन्स वनडे आणि टी-२० संघातील महत्त्वाचा सदस्य आहे. यासंदर्भात केकेआर संघ व्यवस्थापनाने अद्याप कोणतीही अपडेट दिलेले नाही. आयपीएलच्या या हंगामात कमिंन्सने फक्त ५ सामने खेळले आहेत. त्याने ७ विकेट आणि ६३ धावा केल्या असून यात मुंबई इंडियन्सविरुद्ध १४ चेंडूत केलेल्या नाबाद ५६ धावांचा समावेश आहे.

Advertisement

स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती अखेरच्या टप्प्यात आल्या आहेत. केकेआरच्या १२ लढतीत १० गुण असून प्लेऑफमध्ये त्यांना एखादा चमत्कारच पोहोचवू शकतो. या संघात झालेल्या पहिल्या लढतीत पॅट कमिंन्सने वादळी फलंदाजी केली होती. मुंबईने दिलेल्या १६२ धावांचे लक्ष्य पार करताना केकेआरने १०१ वर ५ विकेट गमावल्या होत्या. मुंबई जिंकेल असे वाटत होते. तेव्हा कमिंन्स नावाचे वादळ आले. त्याने १५ चेंडूत ४ चौकार आणि ६ षटकारासह नाबाद ५६ धावा केल्या आणि संघाला ४ षटक आधीच विजय मिळवून दिला. या दरम्यान त्याने आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतकाच्या विक्रमाशी बरोबरी केली.

पॅट कमिन्सची यंदाची कामगिरी कोलकातासाठी काही खास नव्हती. त्याने जोरदार फटकेबाजी करत एक सामना जिंकून दिला होता, पण गोलंदाजी करताना त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. आता पाठीच्या दुखापतीमुळे तो निर्णायक वेळी संघाची साथ सोडून संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मात्र, त्याची दुखापत फारशी गंभीर नसल्याचे बोलले जात आहे. संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या दुखापतीतून सावरण्यासाठी कमिन्स आयपीएल संपण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला परतणार असून तो मायदेशात स्वत:ला पूर्णपणे तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाला जून आणि जुलै महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तीन टी-२०, पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. कमिन्स हा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधारही आहे.

Advertisement