कोलकाताने जरी कालचा सामना जिंकला असला तरी चर्चा मात्र घातक बुमराहचीच होतेय

कोलकाताने जरी कालचा सामना जिंकला असला तरी चर्चा मात्र घातक बुमराहचीच होतेय
कोलकाताने जरी कालचा सामना जिंकला असला तरी चर्चा मात्र घातक बुमराहचीच होतेय

आयपीएलच्या १५व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने फलंदाजांची दाणादाण उडवली. त्याने ४ षटकात १० धावा देत ५ विकेट मिळवल्या. आयपीएल २०२२मध्ये सोमवारी झालेल्या लढतीत भलेही कोलकाता नाईट रायडर्सनी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवला असला तरी मुंबईचा जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे त्यांच्याकडे उत्तर नव्हते. या सामन्यात बुमराहने पुन्हा एकदा दाखवून दिले की चॅम्पियन हा नेहमी चॅम्पियनच असतो.

कोलकाता नाइट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात बुमराहने आयपीएल करिअरमधील सर्वात शानदार स्पेल टाकली. बुमराहने ४ ओव्हरमध्ये १ ओव्हर निर्धाव टाकली, तर १० धावा देत पाच विकेट घेतल्या. आयपीएलमध्ये एका सामन्यात पाच विकेट घेण्याची बुमराहची ही पहिली वेळ आहे.

Advertisement

१८वे षटक चाहते विसरणार नाहीत…

बुमराहने केकेआरच्या डावातील १८वे षटक शानदार स्टाईलने टाकले. त्याची ही ओव्हर क्रिकेट चाहते दिर्घकाळ लक्षात ठेवतील. या ओव्हरमध्ये बुमराहने ३ विकेट घेतल्या आणि एकही धाव दिली नाही. बुमराहने या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शेल्डन जॅक्सनला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिंन्सला माघारी पाठवले, तर चौथ्या चेंडूवर सुनील नरेनची विकेट घेतली.

Advertisement

आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजीमध्ये अनिल कुंबळेनंतर आता जसप्रीत बुमराहचा क्रमांक लागतोय. कुंबळेने ५ धावा देत ५ विकेट घेतल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील सर्वोत्तम गोलंदाजीबाबत बुमराह आता पाचव्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वोत्तम गोलंदाजीच्या बाबत अल्जारी जोसेफ पहिल्या स्थानावर आहे. त्याने १२ धावा देत ६ विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर सोहेल तनवीर असून त्याने १४ धावात ६ विकेट घेतल्या. एडम जंपाने १९ धावा देत ६ आणि त्यानंतर अनिल कुंबळे आणि जसप्रीत बुमराह यांचा क्रमांक लागतो.

Advertisement

केकेआरविरुद्धच्या सामन्यात बुमराहने ४ षटकात १८ चेंडू निर्धाव टाकले. टी-२० मधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात बुमराहने ११ सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत. काही सामन्यात तो महाग ठरला होता.

Advertisement