कोलकाताने आजचा सामना हारल्यास दिल्लीच्या प्ले-ऑफ मध्ये जाण्याच्या आशा पुन्हा निर्माण होतील, काय आहे समीकरण वाचा…

कोलकाताने आजचा सामना हारल्यास दिल्लीच्या प्ले-ऑफ मध्ये जाण्याच्या आशा पुन्हा निर्माण होतील, काय आहे समीकरण वाचा...
कोलकाताने आजचा सामना हारल्यास दिल्लीच्या प्ले-ऑफ मध्ये जाण्याच्या आशा पुन्हा निर्माण होतील, काय आहे समीकरण वाचा...

आयपीएलच्या १५व्या हंगामात आज सोमवारी राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणारी लढत कोलकाता नाईट रायडर्ससाठी करो वा मरो अशी आहे. जाणून घ्या या सामन्यातील X फॅक्टर काय आहे ते.. आयपीएल २०२२ मध्ये आज होणारी ४७वी लढत कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. वानखेडे मैदानावर होणारी ही लढत रात्री साडे सात वाजता सुरू होईल. दोन्ही संघांचा या हंगामातील कामगिरीचा विचार करता राजस्थानची स्थिती चांगली आहे. तर केकेआरचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या स्थितीत आहे.

संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या राजस्थानने आतापर्यंत ९ पैकी ६ लढतीत विजय मिळवला आहे. गुणतक्त्यात ते १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. या उटल केकेआरने ९ पैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळवलाय. ते गुणतक्त्यात सातव्या स्थानावर आहेत. दोन्ही संघात आजवर झालेल्या २६ लढतीत १३ केकेआरने तर १२ राजस्थानने जिंकल्या आहेत.

Advertisement
PosTeamPlyd.WonLostTiedNet RR.Pts
1Gujarat Titans (GT)  9810+0.37716
2Lucknow Super Giants (LSG)  10730+0.39714
3Rajasthan Royals (RR)  9630+0.45012
4Sunrisers Hyderabad (SRH)  9540+0.47110
5Royal Challengers Bangalore (RCB)  10550-0.55810
6Delhi Capitals (DC)  9450+0.5878
7Punjab Kings (PBKS)  9450-0.4708
8Kolkata Knight Riders (KKR)  9360-0.0066
9Chennai Super Kings (CSK)  9360-0.4076
10Mumbai Indians (MI)  9180-0.8362

या हंगामाचा विचार केल्यास दोन्ही संघात अनेक स्टार खेळाडू आहेत, जे एकहाती सामना फिरवू शकतात. केकेआर संघात एरोन फिंच, श्रेयस अय्यर, आंद्रे रसेल हे मॅच विनर तर राजस्थानकडे जोस बटलर, संजू सॅमसन आणि शिमरोन हेटमायर हे स्फोटक फलंदाज आहेत. तर दुसरीकडे कोलकाता संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर असून प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी या संघाला आणखी मेहनत घ्यावी लागणार आहे. या संघाने एकूण नऊ सामन्यांपैकी तीन सामन्यांत विजय मिळवलेला आहे. तर सहा सामन्यांमध्ये कोलकाताचा पराभव झालेला आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून गुणतालिकेत वरचे स्थान गाठण्यासाठी कोलकाता संघ पूर्ण ताकतीने प्रयत्न करणार आहे.

केकेआरचे अरॉन फिंच आणि व्यंकटेश अय्यर अपेक्षेप्रमाणे खेळताना दिसत नाहीयेत. तर दुसरीकडे आंद्रे रसेलने सुरुवातीच्या काही सामन्यांत उत्तम खेळी केलेली असली तरी त्याने सध्या आपला फॉर्म गमावलेला आहे. गोलंदाजी विभागातील फिरकीपटू सुनिल नरेन आणि वरुण चक्रवर्ती या जोडीने चांगली कामगिरी करुन दाखवलेली नाही. त्यामुळे गोलंदाजी विभागातही या संघाला काम करण्यास संधी आहे. पॅट कमिन्सदेखील चांगली कामगिरी करु न शकल्यामुळे त्याच्याऐवजी टीम साऊदी याला संधी देण्यात आली होती. आजच्या सामन्यात पॅट कमिन्सला संधी दिली जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

तर दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सविरोधातील सामना गमावला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात खेळाडूंना मेहनत करावी लागणार आहे. परदेशी खेळाडू डॅरेल मिशेल याचा खेळ राजस्थानसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. त्यामुळे मिशेलऐवजी आता जिमी निशाम किंवा ओबेद मॅक्कॉय याला संधी दिली जाऊ शकते. त्यामुळे आजच्या सामन्यात राजस्थान काय जादू दाखवणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पिच रिपोर्ट-

Advertisement

वानखेडेचे पिच हे नेहमी फलंदाजांसाठी अनुकल असते. पण गेल्या काही सामन्यात चेंडू बॅटवर येण्यास उशीर लागतो. त्यामुळे १५० ही धावसंख्या देखील विजयासाठी पुरेशी ठरते.

संभाव्य संघ-

Advertisement

कोलकाता नाईट रायडर्स- एरोन फिंच, वेंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर, नितीश राणा, आंद्रे रसेल, शेल्डन जॅक्सन, पॅट कमिंन्स,सुनील नरेन, उमेश यादव, अमन हकीम खान आणि वरुण चक्रवर्ती

राजस्थान रॉयल्स- जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, रासी वॅन डेर डूसन, शिमरोन हेटमायर, रविंद्र जडेजा, रियान पराग, ट्रेंट बोल्ट, कुलदीप सेन, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल

Advertisement