कोलकाताच्या फलंदाजाने कोरोनावर मात करून गोलंदाजांची केली धुलाई; नेमके कोण आहे तो वाचा…

कोलकाताच्या फलंदाजाने कोरोनावर मात करून गोलंदाजांची केली धुलाई; नेमके कोण आहे तो वाचा...
कोलकाताच्या फलंदाजाने कोरोनावर मात करून गोलंदाजांची केली धुलाई; नेमके कोण आहे तो वाचा...

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएलच्या १४व्या हंगामाला सुरूवात झाली. गेल्या वर्षी याच कारणामुळे आयपीएलचा १५वा हंगाम महाराष्ट्रात घेण्यात आला होता. पण या वर्षी पुन्हा भारतात त्याचे आयोजन होत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयपीएलमधील काही खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील लोकांना कोरोनाची लागण झाली होती. आयपीएल सामनावीर नितेश राणाने धमाकेदार फलंदाजी केली आणि संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली.

आयपीएल २०२२मध्ये भाग घेणाऱ्या ज्या पहिल्या खेळाडूला करोनाची लागण झाली होती त्या कोलकाताच्या नितिश राणाने पहिल्याच सामन्यात धमाकेदार कामगिरी केली. काल मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमच्या मैदानावर सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात राणाने तुफान फलंदाजी केली. या सामन्यात हैदराबादने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिलला १५ धावांवर बाद करून हैदराबादने चांगली सुरूवात केली. पण त्यानंतर नितिश राणा आणि राहुल त्रिपाठी या जोडीने फक्त डाव सावरला नाही तर गोलंदाजांचा समाचार देखील घेतला. राणा प्रथम गिल सोबत ५३ धावांची तर राहुल सोबत दुसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागिदारी केली. या दोन्ही भागिदारीत राणाचे योगदान सर्वाधिक होते.

Advertisement

राणाने ५६ चेंडूत १४२.८६च्या सरासरीने ८० धावा केल्या. यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. राणाच्या या धमाकेदार फलंदाजीमुळे कोलकाताला १८७ धावांपर्यंत मजल मारता आली. त्याच्या या खेळीसाठी सामनावीर म्हणून राणाचा गौरव करण्यात आला. या सामन्यात राणाने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून स्फोटक खेळीचा इशारा दिला आणि त्यानंतर ८० धावा करून सिद्ध देखील करून दाखवले. पण दुसऱ्या चेंडूवर तो बाद देखील झाला. रसेल बाद झाला तेव्हा केकेआरने ८ विकेट गमावल्या होत्या. तळातील फलंदाजांना ४ चेंडूत १२ धावांचे आव्हन पार करता आले नाही.

Advertisement