कोरोना काळात मोदींचा दुसरा विदेश दौरा: पंतप्रधान 24 सप्टेंबरला QUAD च्या बैठकीसाठी अमेरिकेत पोहोचतील, 25 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत देतील भाषण


Advertisement

नवी दिल्ली3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • शेवटची क्वाड बैठक 12 मार्च 2021 रोजी व्हर्चुअल झाली होती.

क्वाड देशांनी आता चीनच्या विरोधात एकवटणे सुरू केले आहे. 24 सप्टेंबर रोजी अमेरिकेत पहिली इन-पर्सन (ज्यात नेते उपस्थित असतील) शिखर परिषद होणार आहे. वॉशिंग्टन येथे होणाऱ्या या शिखर परिषदेचे यजमानपद अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याकडे असणार आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानी पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचाही समावेश असेल. मोदी 25 ऑगस्टला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषणही करतील.

Advertisement

शिखर परिषदेत, 12 मार्च रोजी आयोजित क्वाडच्या व्हर्चुअल बैठकीत निश्चित केलेल्या अजेंड्यांच्या प्रगतीवर चर्चा केली जाईल. या व्यतिरिक्त, कोविड -19, हवामान बदल, नवीन तंत्रज्ञान, सायबरस्पेस आणि इंडो-पॅसिफिक प्रदेश मुक्त ठेवण्यासारख्या मुद्द्यांवर सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाईल. हा ग्रुप 2007 मध्ये तयार करण्यात आला होता, परंतु चार देश एकत्र भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. कोरोना काळात पंतप्रधान मोदींचा हा दुसरा परदेश दौरा आहे.

6 पॉइंटमध्ये समजून घ्या, मागच्या बैठकीत काय झाले होते
1. क्वाड देश चीनवर कारवाई करतील

शेवटची क्वाड बैठक 12 मार्च 2021 रोजी व्हर्चुअल झाली होती. क्वाडची ही पहिली बैठक होती. यामध्ये चीनला अनेक मोर्च्यांवर घेरण्याची रणनीती आखण्यात आली होती. चीनच्या लस धोरणाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेने गरीब देशांना लस पुरवण्याचे मान्य केले होते.

Advertisement

2. लसीचे उत्पादन वाढवण्याचा करार झाला
चार देशांनी लस तयार करण्याची आपली संसाधने शेअर करण्याचे मान्य केले होते. याचा अर्थ असा की लसी बनवण्याची चार देशांची क्षमता आणखी वाढवली जाईल.

3. बैठकीत पीएम मोदी काय म्हणाले?
बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, हवामान बदल हा आमच्या प्राधान्याच्या सर्वोच्च स्थानावर आहे. आम्ही एक धर्मनिरपेक्ष, स्थिर आणि समृद्ध इंडो पॅसिफिक साठी एकत्र काम करू जेणेकरून सामायिक मूल्यांना पुढे नेता येईल. मी या पॉझिटिव्ह व्हिजनला भारताचे प्राचीन तत्त्वज्ञान ‘वसुधैव कुटुंबकम’ चा विस्तार म्हणून पाहतो.

Advertisement

4. बायडेन म्हणाले होते – एक नवीन यंत्रणा आणेल
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन म्हणाले होते की, अमेरिका इंडो-पॅसिफिकमधील सर्व सहयोगी देशांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी अमेरिका एक नवीन यंत्रणा आणणार आहे, असे ते म्हणाले होते.

5. ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी नमस्तेने केली होती आपल्या भाषणाची सुरुवात
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी ‘नमस्ते’ ने आपल्या भाषणाची सुरुवात केली होती. ते म्हणाले होते की 21 व्या शतकात इंडो-पॅसिफिक प्रदेश जगाचे भवितव्य ठरवेल. यासाठी या प्रदेशातील अनेक देशांना एकत्र येऊन काम करावे लागेल.

Advertisement

6. जपानी पंतप्रधान म्हणाले होते – क्वाडशी भावनिक संबंध
या बैठकीत जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा म्हणाले की मी क्वाडबद्दल भावनिक आहे. आमची बांधिलकी मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशासाठी आहे. आम्हाला या प्रदेशात शांतता आणि स्थिरता हवी आहे. त्यासाठी चारही देशांचे सहकार्य आवश्यक आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here