कोरोना अलर्ट: 11 दिवसांतच 87 हजार सक्रिय रुग्णवाढ; पैकी 85 हजार केरळचे, देशात पुन्हा सक्रिय रुग्णांत वाढीचा ट्रेंड दिसू लागला


  • Marathi News
  • National
  • Corona Patient Update 87 Thousand Active Outbreaks In 11 Days; Of These, 85,000 Are From Kerala

Advertisement

नवी दिल्ली5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशात काेरोनाच्या सक्रिय रुग्णांत वाढीचा ट्रेंड पुन्हा सुरू झाला आहे. गेल्या ११ दिवसांत ८७,३९३ सक्रिय रुग्ण वाढले आहेत. पैकी ८५,५३५ एकट्या केरळात वाढले. याआधी सलग १०६ दिवसांपर्यंत घसरणीमुळे देशात सक्रिय रुग्णांची संख्या ३७ लाखांवरून ३ लाख ६ हजारांवर आली होती. आता ती पुन्हा ३.९४ लाखावर गेली आहे. २३ ऑगस्टपासून वाढ सुरू झाली. कारण रोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांचीही संख्या त्याच दिवसापासून वाढू लागली होती. २३ ऑगस्टला नव्या रुग्णांची सरासरी ३१ हजार होती. ती आता ४४ हजार आहे. तथापि, पैकी ३१ हजार रुग्ण एकट्या केरळात सापडत आहेत. यामुळे सर्वाधिक २.४ लाख सक्रिय रुग्णही केरळातच आहेत.

Advertisement

केरळात ऑफलाइन परीक्षेला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
केरळात इयत्ता अकरावीची परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या निर्णयावर सर्वाेच्च न्यायालयाने तूर्त स्थगिती आणली आहे. कोर्टाने पुढील सुनावणी म्हणजे, १३ सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. कोर्ट म्हणाले, मुलांना जोखमीत टाकता येणार नाही. केरळात वाढत्या रुग्णांमुळेे स्थिती चिंताजनक आहे. देशातील ७०% पेक्षा जास्त रुग्ण केरळात आढळत आहेत. तेथे रोज ३१ हजारांपेक्षा जास्त बाधित सापडत आहेत. यामुळे ऑफलाइन परीक्षेला परवानगी दिली जाऊ शकत नाही.

कोरोनाची कोंडी; उत्तर, पश्चिम आणि मध्य भारताच्या १५ राज्यांत आता फक्त ६१३९ सक्रिय रुग्ण, म्हणजे ०.२%
गुजरात, राजस्थान, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, झारखंड, मप्र, छत्तीसगड, हिमाचल, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड व लडाखमध्ये एकूण फक्त ६,१३९ सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजे देशाच्या फक्त ०.२ टक्के.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here