कोरोनाने आयपीएलमध्ये पुन्हा काढले डोकं वर बीसीसीआयची अ‍ॅक्शन मोड मध्ये

कोरोनाने आयपीएलमध्ये पुन्हा काढले डोकं वर बीसीसीआयची अॅक्शन मोड मध्ये
कोरोनाने आयपीएलमध्ये पुन्हा काढले डोकं वर बीसीसीआयची अॅक्शन मोड मध्ये

आयपीएलच्या १५व्या हंगामात करोनाचा शिरकाव झालाय. दिल्ली कॅपिटल्सचे फिजिओ पॅट्रिक फरहार्ट यांना करोनाची लागण झाली आहे. आयपीएलकडून ही माहिती देण्यात आली आहे. सध्या दिल्ली कॅपिटल्सचे वैद्यकीय पथक फरहार्ट यांची काळजी घेत आहेत. करोनामुळे आयपीएलचा गेला हंगाम स्थगित करण्याची वेळ आली होती. ४ मे २०२१ रोजी आयपीएल २०२२चा हंगाम स्थगित करण्यात आला होता. तेव्हा सनरायझर्स हैदराबादचा विकेटकीपर ऋद्धिमान साहा आणि दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू अमित मिश्रा यांना करोनाची लागण झाली होती. स्पर्धा स्थगित झाली तेव्हा फक्त २९ लढती झाल्या होत्या. त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित हंगाम युएईमध्ये सहा महिन्यांनी आयोजित केला. करोनामुळे आयपीएल २०२०चे आयोजन देखील युएईमध्ये करण्यात आले होते.

दिल्ली संघात करोनाचा प्रवेश झाल्याने बीसीसीआयने दिल्ली संघाला सामना झाल्यानंतर सोशल डिस्टेंसिंगचे पालन करण्यास सांगितले आहे. करोनाचा क्रिकेटवर जास्त प्रभाव पडला आहे. आता आयपीएलमध्ये करोनाचा शिरकाव झाल्याने बीसीसीआयची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या वर्षी भारताच्या इंग्लंड दौऱ्यात करोनाचा शिरकाव झाल्याने पाचवी कसोटी स्थगित करण्यात आली होती. तेव्हा न झालेली कसोटी आता जुलै २०२२ मध्ये होणार आहे. आयपीएल २०२२ मध्ये दिल्लीने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. त्यापैकी दोनमध्ये विजय तर दोनमध्ये पराभव झालाय. गुणतक्त्यात ते सातव्या स्थानावर आहेत. काल शनिवारी झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्यांचा १६ धावांनी पराभव केला.

Advertisement

मीडिया रिपोर्ट्सनुसार आयपीएल २०२२साठी बीसीसीआयने काही कठोर निर्णय घेतले आहेत. जर कोणत्याही संघाकडून किंवा खेलाडूकडून बायो बबलचे उल्लंघन झाले तर त्यांना मोठा फटका बसू शकतो. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार बायो-बबलचा नियम मोडल्यास बीसीसीआयकडून खेळाडूंवर सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. संघाकडून अशी काही चूक झाली तर त्याचे गुण कापले जातील. इतक नाही तर एक कोटी रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. आयपीएल २०२१ मधील बायो बबलचे उल्लंघन चर्चेत आले होते. तेव्हा बायो बबलच्या नियमांचे योग्य पालन न केल्यामुळे करोना व्हायरसचा शिरकाव झाला होता आणि आयपीएलचा हंगाम स्थगित करण्याची वेळ आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी युएईमध्ये आयपीएलचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम चूक झाली तर- बायो बबलच्या नियमांचे प्रथम उल्लंघन केले तर संबंधित खेळाडू किंवा अधिकारी यांना ७ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करावा लागले. या काळातील सामन्याचे पैसे देखील मिळणार नाहीत. दुसऱ्यांदा चूक झाली तर- नियमांचे उल्लंघन दुसऱ्यांदा झाली तर सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासोबतच एक सामना खेळण्यास बंदी घातली जाईल. तिसऱ्यांदा चूक झाली तर- एखाद्या खेळाडूकडून किंवा अधिकाऱ्याकडून तिसऱ्यांदा अशी चूक झाली तर उर्वरित हंगामातून बाहेर केले जाईल आणि संबंधित संघाला त्याच्या जागी दुसरा खेळाडू देखील मिळणार नाही.

Advertisement