कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय: औरंगाबाद शहरातील 1 ली ते 8 वीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद, महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय


Advertisement

औरंगाबाद32 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान आता राज्य सरकारकडून निर्बंध कठोर केले जात आहे. औरंगाबाद शहरातही रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील 1 ली ते 8 वीच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांचे शिक्षण पुन्हा ऑनलाइन पध्दतीने सुरु असणार आहे.

Advertisement

दरम्यान नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे शिक्षण हे पूर्वी प्रमाणे चालू ठेवण्यात येणार आहे. ओमायक्रॉन व्हेरिएंटचा धोका सध्या राज्यासह शहरावर आहे. यामुळे गर्दी कमी करणे गरजेचे आहे. तसेच लहान मुलांच्या आरोग्याला असणारा धोका लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement