कोरोनाची दहशत: नैनीतालमध्ये कोरोनाचा स्फोट, एकाच शाळेतील 85 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह, शाळेत चिंतेचे वातावरण


  • Marathi News
  • National
  • Corona | Nainital | Covid19| Corona Blast At A School In Nainital; 85 Students Corona Positive, Anxiety At School

Advertisement

नैनीताल11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान उत्तराखंडातील नैनीताल जिल्ह्यातील जवाहर नवोदय या शाळेत सुमारे 85 विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

Advertisement

त्यामुळे शाळेत तसेच पालकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंगरकोट परिसरातील एका शाळेत या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. नैनीतालचे उपजिल्हाधिकारी राहुल शाह यांनी सांगितले की, RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात येत आहे.

देशात गेल्या 24 तासांमध्ये 27,443 कोरोना पॉझिटिव्ह आढळले, 282 लोकांचा झाला मृत्यू, ओमायक्रॉनचे 1596 केस आले समोर

Advertisement

देशात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 27,443 पॉझिटिव्ह केस समोर आले आहेत. आज 282 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 9110 लोक बरे झाले आहेत. तर अॅक्टिव्ह पेशेंट्सची संख्या शनिवारी रात्री उशीरापर्यंत 18051 होती. 94 नवीन ओमायक्रॉन संक्रमितांसह देशात शनिवारी नवीन व्हेरिएंटच्या पेशेंट्सची संख्या 1596 झाली. यामधून 576 ओमायक्रॉन पेशेंट्स बरे झाले आहेत. तर 1020 अॅक्टिव्ह केस आहेत. शुक्रवारी 1,796 प्रकरणे आणि 1.73% पॉझिटिव्ह रेट नोंदवण्यात आला होता. तर गुरुवारी 2.44% पॉझिटिव्हिटी रेटसह 1,313 प्रकरणे नोंदवण्यात आली होती.

आणखी काही कोरोनाच्या बातम्या

Advertisement
  • जम्मू-काश्मीरच्या श्री वैष्णो माता देवी विद्यापीठातील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर विद्यापीठ काही काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • तेलंगाना सरकारने देखील सर्व प्रकारच्या सभा-समारंभांवर काही काळ बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यास एक हजार रुपयांचा दंड भरावे लागणार आहे.
  • हरियाणा सरकारने देखील गुरुग्राम, फरीदाबाद आणि अन्य तीन जिल्ह्यात चित्रपटगृहे, मैदाने, स्विमिंग पुल आणि मनोरंजन पार्क बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारी आणि खाजगी कार्यालयात क्षमतेच्या 50% उपस्थिती असणार आहे. 12 जानेवारीपर्यंत हे निर्बंध कायम राहतील.
  • कर्नाटकचे मुख्यमंत्री बीसी नागेश हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांनी स्वत: शनिवारी ट्विट करत माहिती दिली आहे.

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement