कोरोनाचा तिसरा डोस देण्यास सुरुवात: दोन्ही डोस घेतलेल्या कोमॉर्बिडिटी वयस्करांना प्रीकॉशन डोस; फ्रंटलाइन आणि हेल्थकेअर वर्कर्स देखील याच श्रेणीत


Advertisement

नवी दिल्ली12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत भयावह परिस्थिती दिसत आहे. देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात येत आहेत. वयस्करांची इम्यूनिटी सिस्टम कमजोर असते, अशा वेळी त्यांना जास्त धोका असतो. हे पाहता देशात आज, म्हणजेच 10 जानेवारीपासून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या वयस्करांना प्रीकॉशन डोस देण्यास सुरुवात केली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, देशात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे जवळपास 11 कोटी नागरिक आहेत.

Advertisement

दिल्लीसह, देशातील विविध राज्यांमधील फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोमॉर्बिडिटी (अनेक रोगांनी ग्रस्त) लोकांना तिसरा डोस किंवा प्रीकॉशन डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या राज्यांमधून प्रीकॉनकशन डोसचे फोटोज देखील समोर आली आहेत. तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री स्टॅलिन स्वत: आरोग्य केंद्रात उपस्थित होते, तर तेलंगणात आरोग्यमंत्री टी हरीश राव उपस्थित होते.

वृद्धांसोबतच हा तिसरा डोस फ्रंटलाइन वर्कर्स आणि हेल्थकेअर कर्मचाऱ्यांनाही दिला जाणार आहे. निवडणुकीत ज्यांची ड्यूटी लावली जाईल त्यांनाही फ्रंटलाइन वर्कर्सच्या श्रेणीत ठेवण्यात आले आहे. यासह, देशात सुमारे 30 कोटी फ्रंटलाइन वर्कर्स आणि आरोग्य सेवा कर्मचारी आहेत.

Advertisement

वृद्धांना तिसरा डोस देण्यासाठी तीन अटी

  1. लसीचे दोन डोस पूर्ण झाले पाहिजे
  2. दुसरा डोस कमीत कमी 9 महिन्यापूर्वी (37 आठवडे किंना 273 दिवस) पहिले घेतलेला पाहिजे.
  3. केवळ कोमॉर्बिडिटी (अनेक आजारांपासून ग्रस्त)असणारे वृद्ध तिसरा डोस घेऊ शकतील.

जानेवारीत कोणाला मिळेल तिसरा डोस
ज्या लोकांना 3 मे किंवा याच्या पहिले दुसरा डोस देण्यात आला आहे त्यांना 31 जानेवारीपर्यंत प्रीकॉशन डोस मिळेल. जर संबंधित व्यक्ती प्रीकॉशन डोससाठी एलिजिबल होईल, तेव्हाच कोविन त्याला टेक्स्ट मॅसेज पाठवून सूचना देईल की, तिसरा डोस घेण्याची वेळ आली आहे.

Advertisement

बातम्या आणखी आहेत…Source link

Advertisement